अमोल कोल्हे म्हणतात पवारांमुळे ठाकरे मुख्यमंत्री, आता शिवसेनेचा सवाल “राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?”
ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका" असा सल्लाही शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिला.
पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे (Kishor Kanhere) यांनी टोला लगावला. (Shivsena Answers NCP MP Dr Amol Kolhe’s comment Uddhav Thackeray became CM because of Sharad Pawar)
“पुण्याच्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray), मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?” असा सवालही कान्हेरे यांनी विचारला आहे.
“तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत”
“अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे, अहो कोल्हे, ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका” असा सल्लाही शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी दिला.
“अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका”
“उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत. तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण, दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पहा, फार डोके चालवू नका” अशा शब्दात किशोर कान्हेरे यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल चढवला.
अमोल कोल्हे काय म्हणाले होते?
“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत. लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय. दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळत आहे. वयस्कर नेत्याने असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं” असं खासदार अमोल कोल्हे शिरुरमध्ये बोलले होते. त्यांचा रोख शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे होता.
संबंधित बातम्या
Sharad Pawar Meet PM Modi | ही भेट नॉर्मल, तरी काही घडलं असेल तर माहिती नाही : चंद्रकांत पाटील
(Shivsena Answers NCP MP Dr Amol Kolhe’s comment Uddhav Thackeray became CM because of Sharad Pawar)