शिवसैनिक हळहळले; मातोश्रीतून ‘तो’ धनुष्यबाणही गेला, कार्यकर्ते कासावीस

उद्धव ठाकरे यांना मिळालेलं मशाल हे चिन्हदेखील पुण्यातील पोट निवडणुका होईपर्यंतच राहिल, अशा सूचनाही आयोगामार्फत करण्यात आल्या आहेत.

शिवसैनिक हळहळले; मातोश्रीतून 'तो' धनुष्यबाणही गेला, कार्यकर्ते कासावीस
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 9:57 AM

मुंबई : शिवसेना (Shivsena) हे नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. एकिकडे आयोगाचं आयुध वापरून शिंदे गट एकानंतर एक पाऊल उचलत आहे. शिवसेनेचा बचाव करण्यासाठी उद्धव ठाकरे अखेरचे, शर्थीचे प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालालाच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. ही केस सुप्रीम कोर्टात प्रलंबित असली तरीही आयोगाचा निर्णय तोपर्यंत स्थगित करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया करणं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही बंधनकारक आहे. त्यामुळेच शिवसेनेचे महत्त्वाचे निर्णय जिथे घेतले जातात त्या मातोश्री बंगल्यावरील मुख्य बैठकीच्या ठिकाणचे धनुष्यबाण हे चिन्ह काढून टाकण्यात आल्याचं दिसून आलंय.

अरविंद केजरीवाल यांच्या भेटीत काय दिसलं? निवडणूक आयोगाचा निर्णय आलेला नव्हता, तोपर्यंत मातोश्रीच्या मुख्य बैठक कक्षात धनुष्यबाण आणि मशाल ही दोन्ही चिन्ह लावण्यात आली होती. तसेच शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नाव होते. मात्र काल आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीवरील बैठक कक्षातील शिवसेना नाव आणि धनुष्यबाण काढून टाकण्यात आल्याचं दिसून आलं. मातोश्रीतील हा मोठा बदल शिवसैनिकांच्या नजरेतून सुटला नाही. शिवसेनेच्या इतिहासातील या मोठ्या स्थित्यंतरानंतर शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

शिवसैनिकांमध्ये हळहळ

मातोश्रीतील मुख्य कक्षातील धनुष्यबाण चिन्ह गायब झाल्याचे दृश्य पाहिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. सुरुवातीला ठाणे आणि मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, तेव्हा ढाल- तलवार हे शिवसेनेचं मुख्य चिन्ह होतं. त्यानंतर रेल्वे इंजिन, मशाल आदी चिन्ह मिळाली. १९८९ मध्ये शिवसेनेला अधिकृतरित्या धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. तेव्हापासून शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दीत धनुष्यबाण चिन्हाचं महत्त्व अधिक वाढत गेलं. अधिक ठसत गेलं. मात्र शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर ठाकरे कुटुंबीय आणि मातोश्रीवर हे चिन्ह गमावण्याची वेळ आली आहे.

मशाल चिन्ह कधीपर्यंत?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मिळालेलं मशाल हे चिन्हदेखील पुण्यातील पोट निवडणुका होईपर्यंतच राहिल, अशा सूचनाही आयोगामार्फत करण्यात आल्या आहेत. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोट निवडणुकांसाठी उद्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवीन चिन्हासाठीचे पर्याय आयोगाकडे द्यावे लागणार आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.