Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नगरसेवकाचा पक्षाला रामराम, राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेप्रवेश

मनसेकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून दिलीप दातार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून तिकीट मिळण्याची आशा संपल्याने दातार यांनी पक्षांतर केल्याचं बोललं जात आहे

शिवसेना नगरसेवकाचा पक्षाला रामराम, राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेप्रवेश
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 10:11 AM

नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधीपक्षातील दिग्गज नेत्यांनीही पक्षाची साथ सोडून सत्ताधाऱ्यांचा झेंडा हाती घेतला होता. मात्र नाशकात उलटी गंगा वाहताना दिसत आहे. शिवसेना नगरसेवक दिलीप दातार आज मनसेमध्ये प्रवेश (Shivsena Corporator in MNS) करणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दातार मनसेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. दिलीप दातार नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. मात्र त्यांनी कालच नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

मनसेकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून दिलीप दातार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून तिकीट मिळण्याची आशा संपल्याने दातार यांनी पक्षांतर (Shivsena Corporator in MNS) केल्याचं बोललं जात आहे. युती झाल्यास नाशिक पश्चिमची जागा शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे आणि तिथून कोणाला उमेदवारी मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

नाशिकवर राज ठाकरे यांची मजबूत पकड आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा करिष्मा चालला होता. नाशिक शहरातील तिन्ही जागा मनसेने पटकावल्या होत्या. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघही त्यापैकीच एक होता.

मनसे विधानसभा स्वबळावर लढणार? पुण्यात बैठक सुरु

पहिल्या फटक्यात मनसेचे नितीन भोसले आमदार झाले. पाच वर्षांच्या कालावधीत मनसेला मिळालेला जनाधार टिकवता आला नाही. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप नगरसेविका सीमा हिरे आमदारपदी निवडून आल्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक एक लाख 4 हजार मतं मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे.

मनसेकडून माजी गटनेते सलीम शेख किवा शहराध्यक्ष अनिल मटाले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती. परंतु दातारांनी (Shivsena Corporator in MNS) सेनेची साथ सोडत इंजिन जवळ केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमधून स्वगृही परतलेले माजी आमदार अपूर्व हिरे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असतील की जुने नेते नाना महाले यांना संधी मिळणार? हा प्रश्न आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींचा भाग मोडतो. कामगार वर्गाची वस्ती या भागाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. माकपकडून कामगार नेते डॉ. डी. एल. कराड हे पुन्हा नशीब अजमावणार का? याकडेही कामगार विश्वाच लक्ष लागलं आहे.

"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.