नगरमध्ये शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छा होती, पण… : गिरीश महाजन

अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रयत्न झाला नाही, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. या अभद्र युतीचा कोणताही परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही, असा दावा त्यांनी केला. शिवाय वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमशी आमचा कोणताही संबंध नसल्याचं महाजन यांनी म्हटलं. वाचा – आम्हाला मतदान का केलंस?, शिवसेना […]

नगरमध्ये शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छा होती, पण... : गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रयत्न झाला नाही, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. या अभद्र युतीचा कोणताही परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही, असा दावा त्यांनी केला. शिवाय वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमशी आमचा कोणताही संबंध नसल्याचं महाजन यांनी म्हटलं. वाचाआम्हाला मतदान का केलंस?, शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला चोपलं

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. वाचापक्षाच्या आदेशाला केराची टोपली, नगरमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची भाजपला मतं

राष्ट्रवादीची भाजपला साथ

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती केल्यामुळे काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्यामुळे भाजपचा मार्ग आणखी सुकर झाला. 68 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत 35 ही मॅजिक फिगर होती. तिसऱ्या नंबरवर राहूनही शिवाजी कर्डिले यांनी महापौर भाजपचाच होईल, असा दावा यापूर्वीच केला होता. तसंच त्यांनी आज करुन दाखवलं. वाचाअहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018 :

  • शिवसेना – 24
  • राष्ट्रवादी -18
  • भाजप -14
  • काँग्रेस – 5
  • बसपा – 04
  • समाजवादी पक्ष – 01
  • अपक्ष 2
  • एकूण – 68
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.