मुंबई : देशात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. गोवा, पंजाब, उत्तराखंड राज्यातील मतदान पार पडलंय. उत्तर प्रदेशातील निवडणूक 7 टप्प्यात घेण्यात येत आहे. मणिपूरच्या विधानसभेसाठी मतदान व्हायचं आहे. शिवसेनेनं (Shivsena) या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार उभे केले आहेत. गोव्यातील निवडणुकीत प्रचार केल्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आता उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशातील दोमारियागंज आणि कोरांव येथे जाहीर सभा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवसेनेचं मिशन उत्तर प्रदेश यशस्वी होणार का हे पाहावं लागणार आहे.
शिवसेना उमेदवारांचा प्रचार गोव्यात केल्यानंतर आदित्य ठाकरे आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. 24 तारखेला शिवसेना नेते-मंत्री आदित्य ठाकरे यांचा उत्तर प्रदेश दौरा असल्याची माहिती आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या दोन जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. दोमारियागंज आणि कोरांव येथे आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभा होतील.
शिवसेनेनं महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. शिवसेनेनं गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली आहे. तर, उत्तर प्रदेशात देखील शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. उत्तर प्रदेशातील चारशे जागांपैकी 51 जागांवर शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचं महाराष्ट्राबाहेर उमेदवार उभे करण्याचं धोरण असल्याचं जाहीर केलं होतं. त्याप्रमाणं शिवसेना या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं राज्याबाहेर पुन्हा एकदा ताकद आजमावून पाहत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 2024 लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेश आणि दक्षिण गुजरातमध्ये उमेदवार उभं करणार असल्याचं म्हटलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये आणि गोव्यात शिवसेनेला किती यश मिळतं यावर त्यांची आगामी काळातील वाटचाल अवलंबून आहे.
22.02.2022 युनिक तारखेला 65 जणांचं लग्न! आता तरी लग्नाचा वाढदिवस लक्षात राहील ना?
मध्य प्रदेश पूर्ण निर्बंधमुक्त, कोरोना निर्बंधातून महाराष्ट्राची कधी सुटका?