VIDEO: भास्कर जाधवांकडून पंतप्रधान मोदींची मिमिक्री, म्हणाले…
Bhaskar Jadhav | देशात अतिप्रचंड महागाई झाली आहे. आज घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती किती वाढल्या आहेत? मध्यंतरी मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली. तेव्हा नागरीक नरेंद्र मोदी फुकट गॅस देत आहेत, म्हणून त्यांच्यामागे धावत सुटले. तेव्हा मी सातत्याने सांगत होतो की, मोदी सरकार गॅस फुकट देत नाही. ते तुमचा विश्वासघात करणार आहेत, अनुदान बंद करतील.
हिरा ढाकणे, मुंबई: नरेंद्र मोदी 2014 साली सत्तेत येण्यापूर्वी गेल्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने काय केले, असा सवाल विचारत होते. सामान्य नागरिकही, काँग्रेसने काहीच केले नाही, असे सांगत त्यांना प्रतिसाद देत होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन कार्यकाळांमध्ये काहीच केले नाही, हे लोकांच्या आता लक्षात येत असल्याची टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली. ते सोमवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करत त्यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडविली. काँग्रेसने आजपर्यंत काहीच केले नाही, असे मोदी आणि सामान्य नागरिकांकडून म्हटले जात होते. मात्र, लोकांची ही भावना आता बदलली आहे. काँग्रेसने जे करुन ठेवलंय ते विकायचं काम बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा, असे नागरीक मोदींना सांगू पाहत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.
देशात अतिप्रचंड महागाई झाली आहे. आज घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती किती वाढल्या आहेत? मध्यंतरी मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली. तेव्हा नागरीक नरेंद्र मोदी फुकट गॅस देत आहेत, म्हणून त्यांच्यामागे धावत सुटले. तेव्हा मी सातत्याने सांगत होतो की, मोदी सरकार गॅस फुकट देत नाही. ते तुमचा विश्वासघात करणार आहेत, अनुदान बंद करतील. एखादा दुकानदार तुम्हाला नंतर पैसे देण्याच्या अटीवर सामान देतो तेव्हा त्याचा अर्थ दुकानदाराने तुम्हाला सामान फुकट नव्हे तर उधारीवर दिले असा होतो. तो तुमच्याकडून सव्याज पैसे घेणार आहे. मोदी सरकारने सामान्यांना घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान काढून घेतले. या अनुदानामुळे एक वर्ष तुम्हाला गॅस मोफत मिळणार होता. तो अगोदरही मिळत होता. मात्र, मोदी सरकारने हा मोफत मिळणारा गॅस विकत द्यायला सुरुवात करुन लोकांची फसवणूक केल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.
देशात अतिप्रचंड महागाई
देशात अतिप्रचंड महागाई झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकार सर्व पातळ्यावंर पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.
इतर बातम्या:
महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल एलपीजीच्या किंमतीत वाढ
कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?