विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी पुन्हा शिवसेनेचा बुलंद आवाज, डॉ. नीलम गोऱ्हे यांची फेरनिवड
विरोधकांच्या सभात्यागामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
मुंबई : भाजपने हायकोर्टात धाव घेतल्याने विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीत रंगत वाढली होती, मात्र आपल्याला कोर्टाने बोलावले नसल्याचे सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु केली आणि विधानपरिषदेच्या उपसभापती पदी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुनर्नियुक्ती झाली. (Shivsena Leader Dr Neelam Gorhe elected unopposed as Vidhan Parishad Deputy Speaker)
भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. मात्र विरोधकांच्या सभात्यागामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली.
कोण आहेत नीलम गोऱ्हे?
- नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या आहेत
- शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या अशी त्यांची ओळख आहे
- सलग दुसऱ्या वर्षी त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड
- शिवसेनेकडून अनेक वर्षापासून विधानपरिषदेचं प्रतिनिधित्व
- नीलम गोऱ्हे आतापर्यंत तीनवेळा विधानपरिषदेवर निवड
- महिला प्रश्नावर आक्रमकपणे मात्र अभ्यासू भूमिका मांडण्यात अग्रेसर
- राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही भूषवलं
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बिनविरोध निवडीबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो” असेही मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करताना म्हणाले.
“कोरोना संकटकाळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रविण पोटे हे परिषदेवरील आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यात निवडणुकीची घाई का?” असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. विरोधीपक्षांनी कोविड काळात उपसभापती निवडणुकीला स्थगितीसाठी जी याचिका केली होती, त्यावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार आहे.
भाजपकडून दिग्गज नेते आणि विधानपरिषद आमदार भाई उर्फ विजय गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाई गिरकर सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदारपदी नियुक्त झाले आहेत. गिरकर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले असून याआधी राज्यमंत्रिपदाची धुराही सांभाळली आहे. (Shivsena Leader Dr Neelam Gorhe elected unopposed as Vidhan Parishad Deputy Speaker)
78 सदस्यीय विधान परिषदेत 18 जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित 60 पैकी 23 सदस्यांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना 15, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 8, लोकभारती 1 असे 33 आमदारांचे संख्याबळ आहे.
विधान परिषद संख्याबळ
भाजप – 23 शिवसेना – 15 राष्ट्रवादी – 09 काँग्रेस – 08 लोकभारती – 01 शेकाप – 02 अपक्ष – 01 रासप – 01 रिक्त – 18 एकूण – 78
LIVETV | डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी पुनर्नियुक्ती https://t.co/FGyDvzB7sw @neelamgorhe #NeelamGorhe pic.twitter.com/LDfr1TMQZa
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2020
(Shivsena Leader Dr Neelam Gorhe elected unopposed as Vidhan Parishad Deputy Speaker)