Video: सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, गुलाबराव पाटलांनी पुन्हा भरसभेत ‘बाप’ काढला!

Gulabrao Patil | गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागत. कुठलंही काम करायचं असेल तर पात्रतेसाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. पण शरद पवार यांनी असं काही केलं की, बिना लायसन्सचा ड्रायव्हर थेट व्होल्वो गाडीवर बसवला.

Video: सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, गुलाबराव पाटलांनी पुन्हा भरसभेत 'बाप' काढला!
गुलाबराव पाटील, शिवसेना नेते
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 12:02 PM

सोलापूर: शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला, असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणार गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. हे सोडा, पण सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, असे गुलाबराव पाटील यांनी यांनी म्हटले. त्यामुळे आता नारायण राणे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘पवार साहेबांनी बिना लायसन्सच्या ड्रायव्हरला व्होल्वो चालवायला दिली’

राज्यातील माहाविकात आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा दावा भाजपकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सत्ताधारी सांगत असतात. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे. सरकार काहीही केलं तर कोसळणार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दखला देत विरोधकांना घेरलं. गुलाबरावांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

… म्हणून नारायण राणेंचं डोकंही सूक्ष्म झालंय, गुलाबराव पाटलांचा निशाणा

मला माहिती आहे, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागत. कुठलंही काम करायचं असेल तर पात्रतेसाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. पण शरद पवार यांनी असं काही केलं की, बिना लायसन्सचा ड्रायव्हर थेट व्होल्वो गाडीवर बसवला. उद्धव ठाकरे ड्रायव्हर, अजित पवार कन्डक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी झाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की हा ड्रायव्हर अपघात करेल. ज्याने आयुष्यात गाडी चालवली नाही त्याला थेट व्होल्वो गाडी देण्यात आली. पण दोन वर्षामध्ये किती टेकड्या, पहाड आले. तरीही आमची तीन लोकांची गाडी सुस्साट चालत आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. संबंधित बातम्या:

आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय’

जो पत्ता करतो गुल, पॉवरफुल्ल… यंदा गुलाल आमचाच, सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीची विजयी घोडदौड

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.