दररोज रिक्षा फोडणार, नितीन नांदगावकरांकडून रिक्षाचालकांना ‘खळ्ळखट्याक’चा इशारा

विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी रिक्षा चालकांना खळखट्याकचा इशारा दिला (Nitin Nandgaonkar facebook post) आहे.

दररोज रिक्षा फोडणार, नितीन नांदगावकरांकडून रिक्षाचालकांना 'खळ्ळखट्याक'चा इशारा
Follow us
| Updated on: Dec 29, 2019 | 12:18 PM

ठाणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी रिक्षा चालकांना खळखट्याकचा इशारा दिला (Nitin Nandgaonkar facebook post) आहे. रिक्षाचे मीटर वाढवण्यासाठी रिक्षाचालक करीत असलेलं बेकायदेशीर कृत्याविरोधात नांदगावकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुलुंडमधील चेक नाक्यावरील एका रिक्षाचे प्रात्यक्षिक दाखवणार व्हिडीओही नितीन नांदगावकरांनी फेसबुकवर अपलोड केला (Nitin Nandgaonkar facebook post) आहे.

या व्हिडीओमध्ये मीटर वाढवण्यासाठी रिक्षाचालक करीत कशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य करत असल्याचे उघड केलं आहे. तसेच या रिक्षाची त्यांनी तोडफोड केली आहे. रिक्षा मराठी भाषिकाची आहे. प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या दररोज रिक्षा फोडणार असा इशाराही नितीन नांदगावकरांनी दिला आहे.

“मुंबईत ज्या ज्या ठिकाणी GST बटण असलेल्या रिक्षा दिसतील. त्या सर्व ठिकाणच्या रिक्षा रोज फोडणार. मुंबईत अशाप्रकारे GST बटण असलेल्या रिक्षा चालू देणार नाही. किती जणांवर गुन्हे दाखल करणार, जनतेची लुटमार थांबणार की नाही?” असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओद्वारे उपस्थित केला (Nitin Nandgaonkar facebook post) आहे.

या व्हिडीओसह त्यांनी एक फेसबुक पोस्टही लिहली आहे. “रिक्षा सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील प्रवासातील एक अविभाज्य भाग, एक विश्वासाचे नाते. पण त्यात आली बेईमानी ती सर्वसामान्य जनतेला लुटण्यासाठी बनवली गेली. बघता बघता मुलुंड मधील चेकनाक्यावर सर्रास सर्वच रिक्षा मध्ये आले घोडा मीटर. सर्व जाती धर्माची लोकं जेंव्हा आपल्याच लोकांना लुबाडायला लागली तर अशा वेळी जनतेने सुद्धा गप्प राहून चालणार नाही. प्रत्येकाने पुढे येऊन विरोध केला पाहिजे.” असे नितीन नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले (Nitin Nandgaonkar facebook post) आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.