वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंना 6 पानी पत्रं, दसरा मेळाव्यातल्या हजेरीबाबतही मोठा निर्णय
6 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना रामदास कदम यांनी पत्र पाठवलं आहे. अनिल परब यांच्यावरील आरोपासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरलं झाली होती. यासंदर्भात कदम यांनी त्यांची बाजू पत्राद्वारे मांडली आहे.
मुंबई: शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. 6 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना रामदास कदम यांनी पत्र पाठवलं आहे. अनिल परब यांच्यावरील आरोपासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरलं झाली होती. यासंदर्भात कदम यांनी त्यांची बाजू पत्राद्वारे मांडली आहे. त्यानंतर रामदास कदम यांना दसरा मेळाव्याल एन्ट्री नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा ष्णमुखानंद सभागृहात पार पडत आहे. रामदास कदम या मेळाव्याला हजर राहणार का याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं रामदास कदम यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कळवलं आहे. इन्फेक्शन टाळण्यासाठी उपस्थितीविषयी निर्णय घेतला आहे. रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांच्या वेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवल्या आहेत.
रामदास कदम तीन महिने आजारी
शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय कदम यांनी निर्णय घेतला आहे. गेले तीन महिने रामदास कदम हे आजारी आहेत. रामदास कदम यांच्यावर ब्रीज कँडी रुग्णालयात आणि घरीचं दोन महिने उपचार सुरु होते. इन्फेक्शनची लागण होऊ नये यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कदम यांनी पत्राद्वारे कळवलं आहे.
कथित ऑडिओ क्लिपमुळं उद्धव ठाकरे नाराज?
कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे यंदाच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना एन्ट्री नसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
उद्धव ठाकरेंना भेटून बाजू मांडणार
शिवसेना नेते रामदास कदम कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपामुंळे नाराज आणि व्यथित असल्याची माहिती आहे. रामदास कदम यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बाजू मांडली आहे. पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा रामदास कदम यांनी पत्रात केला असल्याचं कळतंय. रामदास कदम यांनी आपल्या वेदना उद्धव ठाकरेंपुढे पत्राद्वारे मांडल्या आहेत. आठवडाभरात उद्धव ठाकरेंना व्यक्तिशः भेटून रामदास कदम आपल्या भावना व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.
कथित ऑडिओ क्लिपचं नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
इतर बातम्या:
यंदा शिवसेनेच्या मेळाव्यात ‘राम’दास कदम नाहीत, ऑडिओ क्लिपप्रकरण भोवलं?
रामदास कदमांना दसरा मेळाव्यात जागा नाही? सावंत म्हणतात, निमंत्रणाची पद्धत नाही !
Shivsena Leader Ramdas Kadam wrote letter to Uddhav Thackeray decided to not attend Dasara Melava