मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फोडले आहेत, असा दावा स्वत: एकनाथ शिंदे यांनीचे केलायं. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून वेगळा गट स्थापन केला. या गटात दोन तृतियांश पेक्षा जास्त आमदार आहेत. शिवाय अपक्षांचा पाठिंबा घेऊन ते भाजपसोबत सत्तास्थापन करणार असल्याचे देखील स्पष्ट आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) असल्याचा आरोप केला जातोयं. यासंदर्भात संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सध्या सुरूच आहे. इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवत म्हटंले आहे की, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे शिवसेनाच आहे, शिंदे हे सर्व काही शिवसेनेच्या इशाऱ्यावर करत आहेत. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं, राऊत म्हणाली की उद्धव ठाकरे जे करतात ते थेट करतात. तसेच राऊत पुढे म्हणाले की, एकट्या शिंदेंकडून ऐकढं नियोजन शक्यच नाहीये. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी मागे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदारांना संपर्क साधलायं. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाही तातडीने मुंबईला बोलावले असल्याचे कळते आहे. चंद्रकांत पाटील हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्री तसेच राज्यपाल या दोन्हांनी कोरोनाची लागण झालीये. यामुळे सत्तासंघर्षामध्ये कोरोनाने देखील प्रवेश केलायं. मुख्यमंत्र्याना कोरोनाची लागण झालीये, यावरही राज्यातील नेत्यांमध्ये अभुतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. मुख्यमंत्र्यांची कोरोना अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आहे. मात्र, आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आलीये.