“अजित पवार, अशोक चव्हाणांवर भ्रष्ट्राचाराचा आरोप करणारे मोदीच”, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले “गेल्या 10 वर्षात…”

"मोदी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही असे सांगतात. इतक्या धीटपणे खोटे फक्त मोदीच बोलू शकतात", अशी टीकाही संजय राऊतांनी सामना अग्रलेखातून केली आहे.

अजित पवार, अशोक चव्हाणांवर भ्रष्ट्राचाराचा आरोप करणारे मोदीच, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले गेल्या 10 वर्षात...
संजय राऊतांची सामना अग्रलेखातून टीका
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 11:01 AM

Sanjay Raut On Saamana Editorial : “पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाऱ्यांना कधीही सोडणार नाही, असे सांगतात. पण अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर हल्ला करणारे मोदी होते”, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. “गेल्या 10 वर्षात ईडी, सीबीआयने फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच धाडी टाकल्या. काही प्रमुख आरोपी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना अभय मिळाले आणि कारवाया थांबल्या”, असेही संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊतांनी ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

“मोदी यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचा जुनाच नारा दिला. भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना सोडणार नाही. ईडी, सीबीआयच्या नावाने उगाच बोंब मारू नका. या संस्था उत्तम काम करीत असल्याचे मोदी सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ाप्रमाणे वागत आहेत. या संस्था काम करीत असत्या तर त्यांना दोष देण्याचे कारण नव्हते. पण मागच्या दहा वर्षांत ईडी, सीबीआयने फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच धाडी घातल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांना अटका केल्या. यापैकी काही प्रमुख ‘आरोपी’ भाजपात गेले तेव्हा त्यांना अभय मिळाले व कारवाया थांबल्या, हे खरे नाही काय?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“असंख्य भ्रष्टाचारी मोदींच्या तंबूत आनंदाने नांदतात”

“अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर हल्ला करणारे हेच मोदी होते. हे दोन्ही नेते आज मोदी यांच्या मांडीवर बसले आहेत. असे असंख्य भ्रष्टाचारी मोदी यांच्या तंबूत आज आनंदात नांदत आहेत. तरीही मोदी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही असे सांगतात. इतक्या धीटपणे खोटे फक्त मोदीच बोलू शकतात”, अशी टीकाही संजय राऊतांनी सामना अग्रलेखातून केली आहे.

हे सुद्धा वाचा

“ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्था पक्षपाती आहेत. अनिल देशमुख, संजय राऊत, हेमंत सोरेन यांच्या विरोधात मनी लाँडरिंगचे कोणतेही पुरावे नसल्याचे न्यायालयानेच सांगितले. केजरीवाल यांना नाहक अडकवले, असे ईडीचे कोर्ट सांगते. मग या संस्था सरळमार्गी आहेत व त्यांच्यावर राजकीय दबाव नाही असे कसे मानायचे?” असेही संजय राऊत म्हणाले.

“मोदी धाडसाने खोटे बोलतात”

“पण मोदी धाडसाने खोटे बोलतात. निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी सांगितले की, अंबानी व अदानी हे काँग्रेसला टेम्पो भरून पैसे देतात. पंतप्रधानांनी हे सांगितले म्हणजे खरेच असणार. मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सने अदानी, अंबानी यांना चौकशीसाठी बोलावले काय? निदान मोदी यांना तरी बोलवा. निवडणूक रोखे प्रकरणात भाजपने अनेक कंपन्यांना ‘ठेके’ देऊन, धमक्या देऊन हजारो कोटी आपल्या खात्यात जमा केले. भाजपला पैसे देणाऱ्या अनेक कंपन्यांवर ‘ईडी’ची कारवाई सुरू आहे. म्हणजे हा गुन्हेगारीचा पैसा ‘मनी लाँडरिंग’ पद्धतीने भाजपने जमा केला व मोदी शहाजोगपणे भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या वल्गना करतात. यास ढोंगच म्हणायला हवे”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

Non Stop LIVE Update
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.