तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात; संजय राऊतांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. (shivsena leader sanjay raut slams chandrakant patil)
ठाणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. (shivsena leader sanjay raut slams chandrakant patil)
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांतदादांवर निशाणा साधला. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.
फडणवीस माझ्यावरच टीका करणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत. मित्रं राहतील. त्यांचं दु:ख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला राऊत यांनी लगावला.
निवडणुकांवरून संभ्रम नको
मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे. त्यांना कुणी सांगितलं अशाप्रकारचा काही निर्णय होत आहेत? त्यांच्या हेरांनी… ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली असेल तर ती चुकीची आहे. निवडणुकांचं काय होणार हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतील. ते अधिकारीक व्यक्ती आहेत. तुम्ही कशाला जनतेत संभ्रम निर्माण करत आहात, असा सवालही त्यांनी केला.
एक दिवस मातोश्रीवरही येतील
फडणवीस हे काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधी पक्ष आता जमिनीवर येत आहे हे चांगलं आहे. लोकशाहीत कोणी कुणाचा शत्रू नसतो. महाराष्ट्राची हीच परंपरा आहे. ते खडसेंच्या घरी गेले, त्याचं स्वागत आहे. त्याआधी ते शरद पवारांना जाऊन भेटले. त्यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. मागे आम्ही भेटून लंचही घेतलं होतं. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील. कशाला धुरळा उडवता?, असंही टोलाही त्यांनी लगावला. (shivsena leader sanjay raut slams chandrakant patil)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 2 June 2021 https://t.co/4dmg4uE2lM #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2021
संबंधित बातम्या:
‘…तर ते पवारांना ओळखतच नाहीत’, फडणवीस-पवार भेटीवर राऊतांचा रोखठोक अग्रलेख
शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा
(shivsena leader sanjay raut slams chandrakant patil)