काठ्या नि चष्मे तर मंडळाचे कार्यकर्तेही वाटतात, शिवतारेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनी कुठेही विकास केला नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट असल्याचा दावाही विजय शिवतारे यांनी केला आहे. विजय शिवतारे काय म्हणाले? “शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी […]
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनी कुठेही विकास केला नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट असल्याचा दावाही विजय शिवतारे यांनी केला आहे.
विजय शिवतारे काय म्हणाले?
“शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट आहे. बारामतीच्या विद्यमान खासादर सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात कुठेही विकास केला नाही. त्यांनी फक्त काठ्या, चष्मे, श्रवणयंत्र वाटले. याला विकास म्हणत नाहीत. ते तर मंडळाचे कार्यकर्तेही करतात.”, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली.
तसेच, योद्धा नेहमी तलवार काढून असतो, तो फक्त आदेशाची वाट पाहत असतो, असे म्हणत विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सूचक वक्तव्यही केले.
कोण आहेत विजय शिवतारे?
विजय शिवतारे हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते असून, शिवसेनेचे प्रवक्तेही आहेत. पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे शिवसेनेचे आमदार आहेत. 2009 आणि 2014 अशा दोनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 2014 साली शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर, विजय शिवतारे यांच्याकडे जलसंपदा राज्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली. तसेच, सातारा जिल्ह्याचे शिवतारे पालकमंत्रीही आहेत.