Vinayak Raut : मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली!, म्हणाले, या भ@#$%^…

Vinayak Raut on Eknath Shinde : किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली, असंही विनायक राऊत यांनी यावेळी म्हटलंय. 40 आमदार, 12 खासदार गेले तरीही घाबरू नका, असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना पेटून उठण्यास सांगितलं.

Vinayak Raut : मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली!, म्हणाले, या भ@#$%^...
खालच्या शब्दांत टीकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 7:26 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना विनायक राऊत यांच्या तोंडून शिवी निघाली. मुख्यमंत्र्यांवर विनायक राऊत यांनी पातळी सोडून टीका केल्यामुळे आता राजकारण आणखी तापलं आहे. ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकटं पाडायचं, शिवसेना नाव पुसून टाकायचं, या भ#$%*@#^ करणाऱ्या 40 शिवसेना आमदारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, बिंबवण्याचा त्यांचा उद्देश आहे. पण असं सांगणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावंच लागेल’, असं विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणालेत. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात ते शनिवारी बोलत होते.

किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली, असंही विनायक राऊत यांनी यावेळी म्हटलंय. 40 आमदार, 12 खासदार गेले तरीही घाबरू नका, असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना पेटून उठण्यास सांगितलं. बंडखोरांविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यासाठीही सज्ज राहण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

पाहा व्हिडीओ : विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे वेदांतला गुजरातमध्ये पाठवण्याचे काम शिंदे सरकार यांनी केल्याचा आरोप पुन्हा एकदा विनायक राऊत यांनीकेलाय. विशेष म्हणजे विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलंयय. भगवान के पास देर है, लेकिन अंधेर नही है, असा म्हणत विनायक राऊत यांनी फडणवीसांना टोला हाणला. फडणवीसांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागतेय. शिंदेच्या हाताखाली काम करण्याची नामु्ष्की फडणवीसांना आल्याची टीका राऊतांनी यावेळी केली.

गद्दारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे काम मागाठाणे येथून केले जाणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी नारायण राणे, मोहित कंबोज यांच्यावरही टीका केली. गद्दारांना गाडण्याचा दिवस आला आहे, असं म्हणत विनायक राऊतांनी हल्लाबोल केलाय. यावेळी शिवराळ भाषेत केलेल्या टीकेमुळे विनायक राऊत चर्चेत आलेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.