शिवसेना नाहीतर काँग्रेसकडून, अर्जुन खोतकर दानवेंना भिडणारच?
मुंबई : जालन्यातील शिवसेनेचे मोठे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्यापासून नाराज आहेत. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक असलेल्या खोतकरांना दानवेंचाच प्रचार करावा लागण्याची नामुष्की ओढवली आहे. खोतकरांच्या या नाराजीचा फायदा उचलत, काँग्रेसकडून खोतकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून, गेल्या काही दिवसात […]
मुंबई : जालन्यातील शिवसेनेचे मोठे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्यापासून नाराज आहेत. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक असलेल्या खोतकरांना दानवेंचाच प्रचार करावा लागण्याची नामुष्की ओढवली आहे. खोतकरांच्या या नाराजीचा फायदा उचलत, काँग्रेसकडून खोतकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून, गेल्या काही दिवसात दोनवेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची आणि अर्जुन खोतकर यांची भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच अर्जुन खोतकर यांना पक्षात घेण्सासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. नुसती चाचपणीच नव्हे, तर जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्जुन खोतकर यांनाच उमेदवारी देण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अर्जुन खोतकरांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली, काँग्रेसकडून ऑफर : सूत्र
अर्जुन खोतकर यांना काँग्रेसने पक्षात घेतल्यास आणि जालना लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिल्यास येणाऱ्या काळात शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोतकरांना पक्षात घेतल्यास काँग्रेसला दुप्पट फायदा होणार आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
जालना जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यातच महिन्या-दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा आपणच पराभव करणार असल्याचे सांगत आहेत. किंबहुना, आपणच दानवेंविरोधात लाढणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे खोतकरांच्या बोलण्याला महत्त्व आले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली आणि अर्जुन खोतकरांना घोषणांना धक्का बसला. मात्र, तरीही अर्जुन खोतकर मागे हटण्यास तयार नाहीत. दानवेंविरोधात लढण्यासाठी त्यांना शड्डू ठोकला आहे.
संबंधित बातम्या :
युती झाली तरी बेहत्तर, दानवेंना विरोध कायम: अर्जुन खोतकर
पराभव दिसल्यावर माणूस चवताळतो, दानवेंची अवस्था तशीच झालीय : खोतकर
रावसाहेब दानवेंची गावरान भाषेत अब्दुल सत्तार आणि खोतकरांवर टीका
स्पेशल रिपोर्ट: 1 युती आणि 100 सवाल!
रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला!
‘त्यांच्या’ खात्यात 5000 जमा होणार, दानवे की बोली और बंदूक की गोली
दानवेंना पाडण्यासाठी सेनेचे मंत्री काँग्रेसचा ‘हात’ धरणार?
रावसाहेब दानवेंकडून भाजपचा दुसरा उमेदवार घोषित!
जालना लोकसभा : 20 वर्षांपासून खासदार, पण दानवेंविरोधात नाराजी कायम