आमदार अंबादास दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार
ट्राफिक पोलिसाच्या मदतीनं आमदार दानवे यांनी क्रांती चौकातील वाहतूक कोंडी फोडली. यावेळी दानवे यांनी एका बेशिस्ट रिक्षाचालकाला चोपही दिला होता. आता या रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर अंबादास दानवेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
औरंगाबाद : शहरातील प्रमुख चौक असलेल्या क्रांती चौकात सोमवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. चौकातील चारही बाजूंनी चारचाकी, दुचाकी आणि मोठ्या वाहनांची मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळच शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात असलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आपल्या काही कार्यकर्त्यांसह क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी मोर्चा हाती घेतला. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसाच्या मदतीनं आमदार दानवे यांनी क्रांती चौकातील वाहतूक कोंडी फोडली. यावेळी दानवे यांनी एका बेशिस्ट रिक्षाचालकाला चोपही दिला होता. आता या रिक्षाचालकाच्या तक्रारीनंतर अंबादास दानवेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Ambadas Danve beats rickshaw puller, lodges complaint at Kranti Chowk Police Station)
रिक्षाचालकाला मारहाण केल्या प्रकरणी आमदार अंबादास दानवे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिक्षाचालक अजय जाधवकडून क्रांती चौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत करताना दानवे यांनी रिक्षाचालकाला मारहाण केली होती. औरंगाबादेतील क्रांती चौकात हा प्रकार घडला होता. आता संबंधित रिक्षाचालकाने दानवे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
‘आमदार असलो तरी आधी शिवसैनिक’
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांसह मी आणि शिवसैनिक प्रयत्न कलरत होतो. त्यावेळी एक बेशिस्त रिक्षाचालक मध्येच घुसला. त्यामुळे त्याला शिस्त शिकवण्याचा प्रयत्न आपण केला. मी आमदार आहे, पण आधी मी एक शिवसैनिक आहे. त्या रिक्षाचालकाचा बेशिस्तपणा पाहून माझ्यातला शिवसैनिक जागा झाला होता, अशा शब्दात दानवे यांनी रिक्षाचालकाला फटकावल्याचं समर्थन केलंय.
आमदार दानवेंनी वाहतूक कोंडी फोडली
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांवरुन औरंगाबादेतील नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. त्यामुळे दुपारी चार वाजेच्या आत घरी परतण्यासाठी औरंगाबादकरांची धावपळ पाहायला मिळाली. एकाच वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या उतरल्यामुळे शहरातील मुख्य चौक असलेल्या क्रांती चौकात वाहतूक कोंडी झाली. तिथे उपस्थित असलेल्या ट्राफिक पोलिसही हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा जवळच्याच शिवसेना कार्यालयात उपस्थित असलेले आमदार महोदय क्रांती चौकात दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत केली.
बाजारपेठा ४ वाजता बंद होणार असल्याने बाजारात वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पोलीस बांधवांच्या मदत म्हणून आज क्रांती चौकात शिवसैनिकांसह सेवा बजावली आणि वाहतूक सुरळीत करून दिली. #shivsena #sambhajinagar pic.twitter.com/31u8PP6pJE
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 28, 2021
संबंधित बातम्या :
Video : आमदार अंबादास दानवेंनी फोडली वाहतूक कोंडी, बेशिस्त रिक्षाचालकालाही दिला चोप!
Video : लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी! औरंगाबादच्या वाळूजमध्ये नागरिकांचे मोठे हाल
Ambadas Danve beats rickshaw puller, lodges complaint at Kranti Chowk Police Station