Shivsena MLA Audio Clip : ‘आता आपला निर्णय शिंदेसाहेब’, आमदार रमेश बोरणारेंची कार्यकर्त्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेनेचे वैजापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात ते आपला पप्पू पाटील नावाच्या कार्यकर्त्याशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे. यात आपला निर्णय शिंदे साहेब, असं आमदार बोरणारे सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे.

Shivsena MLA Audio Clip : 'आता आपला निर्णय शिंदेसाहेब', आमदार रमेश बोरणारेंची कार्यकर्त्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल
शिंदे समर्थक आमदार रमेश बोरणाने यांची ऑडिओ क्लिप व्हायरलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 7:59 PM

मुंबई : शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्याने शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळतोय. राज्यसभेपाठोपात विधान परिषद निवडणुकीतही भाजपनं महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार हादरा दिलाय. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. एकीकडे निवडणूक निकालाची धामधुम सुरु असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठलं. तिथे लि मेरेडियन हॉटेलमध्ये शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार आहेत. शिंदे यांचं हे बंड शमवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, शिंदे शिवसेनेनं भाजपसोबत सत्ता स्थापन करावी या मतावर ठाम आहेत. अशावेळी शिवसेनेचे वैजापूर विधानसभेचे आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात ते आपला पप्पू पाटील नावाच्या कार्यकर्त्याशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे. यात आपला निर्णय शिंदे साहेब, असं आमदार बोरणारे सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे.

आमदार रमेश बोरणाने आणि कार्यकर्त्याचा संवाद

आमदार – काय चाललं?

कार्यकर्ता – काही नाही साहेब, तुमच्या आशीर्वादानं तुमच्या मागं.

आमदार – बरंय ना पण?

कार्यकर्ता – हो… तुमचा निर्णय?

आमदार – आता आपला निर्णय शिंदे साहेब.

कार्यकर्ता – आमच्या निर्णय बोरनारे साहेब…

आमदार – आं….

कार्यकर्ता – आमचा सर्वसामान्यांचा निर्णय बोरनारे साहेब

आमदार – शिंदे साहेब ना?

कार्यकर्ता – नाही नाही… तुमचा निर्णय शिंदे साहेब, आमचा निर्णय बोरनारे साहेब.

आमदार – हो… धन्यवाद, धन्यवाद.

कार्यकर्ता – चला… अभिनंदन साहेब.

आमदार – हो… हो… हो…

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात 15 मिनिटे फोनवर चर्चा

एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्यासाठी शिवसेनेकडून हरप्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना सूरतला शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं. सूरतमधील हॉटेल लि मेरेडियनमध्ये त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. जवळपास 18 मिनिटे ही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. नार्वेकर यांच्या फोनवरुनच शिंदे आणि ठाकरे यांच्यात बोलणं झालं असल्याचं सूत्रांकडून कळतंय. यावेळी शिंदे यांनी गटनेते पदावरुन करण्यात आलेली हकालपट्टी, खासदार संजय राऊथ यांनी माध्यमांशी बोलताना केलेल आरोप, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्याचबरोबर तुमचं तुम्ही ठरवा, आता आमचं आम्ही बघतो, असंही शिंदे म्हणाल्याचं सूत्रांकडून कळतंय.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...