Shivsena MLA Disqualification Case | निकाल Live करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा महत्त्वाचा निर्णय
Shivsena MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. कारण या निकालाने बरच चित्र स्पष्ट होणार आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम होतील.
Shivsena MLA Disqualification Case | आजच्या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे. दुपारी 4 वाजल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचन करणार आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. कारण या निकालाने बरच चित्र स्पष्ट होणार आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम होतील. सध्या शिवसेनेत फूट पडली असून दोन गट आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. निकालाआधी दोन्ही गटांकडून निकाल आमच्याच बाजूने लागणार असा दावा केला जात आहे. कारण विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सरकारच भवितव्यही अवलंबून आहे. आमदार अपात्रता प्रकरणात अनेक टेक्निकल, कायदेशीर मुद्दे आहेत. त्यावर विधानसभा अध्यक्षांची भूमिका काय? याकडे कायदे तज्ज्ञाच लक्ष आहे.
दरम्यान आजच्या निकाल वाचनाआधी विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांची बैठक सुरु आहे. विधिमंडळातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठकीला सुरुवात झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल संध्याकाळी देणार आहेत. त्याआधी नियोजन कसे आहे याचा आढावा विधानसभा अध्यक्ष घेत आहेत. दरम्यान निकाल वाचन सुरु असताना तो लाईव्ह करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आमदार अपात्रता निकाल लाईव्ह करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष निकाल वाचन पाहू शकतो. निकालासाठी दोन्ही गटाच्या वकिलांनी उपस्थित रहावे यासाठी विधिमंडळाकडून वकिलांना मेल पाठवण्यात आला आहे.
शिवसेनेच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावलं
दरम्यान मुंबईत असलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावलं आहे. दुपारी 3 वाजता सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. सायंकाळी 4 वाजता पात्र-अपात्र सुनावणीवर होणार अंतिम निर्णय. बाळासाहेब भवन येथे एकत्र जमून सर्व आमदार विधानभवनात जाणार. बाळासाहेब भवनात निकालानंतर काय करायचं यावर चर्चा होणार.