शिवसेना आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र समितीकडून अवैध; नेमकं प्रकरण काय?

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेनेच्या (Shivsena) आमदार लता सोनवणे (Lata Sonawane) यांना नंदुरबारच्या जात पडताळणी समितीने दणका दिलाय.

शिवसेना आमदार लता सोनवणे यांना धक्का, जात प्रमाणपत्र समितीकडून अवैध; नेमकं प्रकरण काय?
लता सोनवणे, शिवसेना आमदार
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 6:38 AM

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चोपडा येथील शिवसेनेच्या (Shivsena) आमदार लता सोनवणे (Lata Sonawane) यांना नंदुरबारच्या जात पडताळणी समितीने दणका दिलाय. त्यांचं टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवलं आहे. या प्रकरणासंदर्भात चोपड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी तक्रार केली होती. दरम्यान, या निकालाविरोधात आमदार सोनवणे उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.आमदार लता सोनवणे यांचा टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दाखला निवडणुकीच्या प्रयोजनार्थ 10 एप्रिल 2019 रोजी जात पडताळणी समितीला सादर केला होता. आमदार सोनवणे यांचा अनुसूचित जमातीचा दावा 4 नोव्हेंबर 2020 रोजीच्या न्यायालयाच्या विस्तृत आदेशान्वये जात पडताळणी समितीने अवैध घोषित केला होता. समितीच्या अवैध आदेशाविरुद्ध आमदार सोनवणे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

आतापर्यंत नेमकं काय घडलं?

औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या प्रकरणी 3 डिसेंबर 2020 रोजी निर्णय देताना समितीचा आदेश रद्दबातल करण्यात आला. अर्जदाराला सक्षम प्राधिकारी म्हणजेच, अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून सात दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश त्यावेळी देण्यात आले होते. तसेच सदर प्रकरण चार महिन्यात निकाली काढण्याबाबत समितीस निर्देश दिले होते. म्हणून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार लता सोनवणे यांनी नव्याने सक्षम प्राधिकारी यांच्याकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून समितीला 9 डिसेंबर 2020 रोजी प्रस्ताव सादर केला होता. आमदार लता सोनवणे यांचा प्रस्ताव दाखल करताना पूर्वीच्या पुराव्यांव्यतिरिक्त नवीन अधिकचे पुरावे प्रस्ताव सोबत सादर करण्यात आले. तसेच सदर पुरावे प्रथमच समितीसमोर आल्याने पुराव्यांची सत्यता पडताळणी करणे आवश्यक असल्याने आमदार सोनवणे यांचे प्रकरण पोलीस दक्षता पथकाकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आले होते.

निर्णयाविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात जाणार

जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याप्रकरणी आमदार लता सोनवणे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. समितीने राजकीय दबावात निर्णय दिलेला आहे. या निर्णयाविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे आमदार लता सोनवणे यांनी सांगितलं.

इतर बातम्या:

आधी बदली, आता थेट निलंबन, बिग बींचा एक्स-बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित

Maharashtra News Live Update : किरीट सोमय्या, नारायण राणेंची आज पत्रकार परिषद, संजय राऊतांना प्रत्युत्तर देणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.