विधानसभेत शिवसेना आमदारांची संख्या घटली!
मुंबई : राज्याच्या विधानसभेच शिवसेनेच्या आमदारांची संख्या घटली आहे. शिवसेनेच्या तीन आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केले आहेत. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव, लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि वरोऱ्याचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी राजीनामे दिले होते. त्यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या विधानसभा आमदारांची संख्या […]
मुंबई : राज्याच्या विधानसभेच शिवसेनेच्या आमदारांची संख्या घटली आहे. शिवसेनेच्या तीन आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केले आहेत. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव, लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि वरोऱ्याचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी राजीनामे दिले होते. त्यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या विधानसभा आमदारांची संख्या कमी झाली आहे.
शिवसेनेचे विधानसभेतील आमदारांची संख्या घटल्याने, आता सेना आमदारांची संख्या 63 वरुन 60 वर आली आहे.
कुणाचे राजीनामे?
हर्षवर्धन जाधव – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळी राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. अखेर हर्षवर्धन जाधवांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
प्रताप पाटील चिखलीकर – नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला होता. चिखलीकरांनी नांदेड महापालिका निवडणुकीतही बंडखोरी करत, उघडपणे भाजपला मदत केली होती. तेव्हापासूनच त्यांनी नाराजी स्पष्ट होती. पुढे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि अखेर आता विधासनभा अध्यक्षांनी राजीनामा मंजूर केला आहे.
बाळू धानोरकर – सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रूपर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार होते. मात्र त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. युती झाल्याने चंद्रपूरची जागा भाजपच्या वाटाला जाऊन, तिथून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर उभे राहिले. त्यामुळे धानोरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि शिवसेनेतून बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं.