प्रताप सरनाईकांची तब्बल 6 तास चौकशी, ईडीकडून कोणते प्रश्न? सरनाईकांची प्रतिक्रिया काय?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ही चौकशी तब्बल सहा तास चालली. (ShivSena Pratap Saranaik ED)

प्रताप सरनाईकांची तब्बल 6 तास चौकशी, ईडीकडून कोणते प्रश्न? सरनाईकांची प्रतिक्रिया काय?
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 8:10 PM

मुंबई : टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अकडकलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ही चौकशी तब्बल सहा तास चालली. दरम्यान, यानंतरही आपण चौकशीला तयार असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ईडीने चौकशी पूर्ण केल्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (ShivSena MLA Pratap Saranaik questioned by the ED, interrogation lasted for six hours)

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते ईडीच्या कार्यालयात गुरूवारी ( 10 डिसेंबर) सकाळी 11 वाजता  हजर झाले. यावेळी त्यांची सतत सहा तास चौकशी चालली. ही चौकशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालली. या चौकशीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.

सरनाईक यांना कोणते प्रश्न विचारले?

प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी टॉप्स सेक्यूरिटीच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत विचारण्यात आलं. तसेच, त्यांना कौटूंबिक माहितीही विचारण्यात आली. तुमच्या कुटुंबात कोण-कोण आहेत?, ते काय करतात?, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. तसेच, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतही सरनाईक यांना विचारण्यात आल्याची माहिती आहे.  (ShivSena MLA Pratap Saranaik questioned by the ED, interrogation lasted for six hours)

सरनाईक कुटुंबाला अटकेपासून संरक्षण

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने अनेकवेळा समन्स बजावले होते. मात्र, दोघेही ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. कोर्टाने आपल्या आदेशात प्रताप सरनाईक यांची तसेच त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याचे अधिकार ईडीला दिलेले आहेत. मात्र, सरानईक यांना अटक करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशानंतर प्रताप सरनाईक गुरुवारी (10 डिसेंबर) ईडीसमोर हजर झाले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सरनाईक यांना अनेक प्रश्न विचारले.

सरनाईक यांच्या घर, कार्यालयावर छापे

ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते.

ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी या दोघांमध्ये तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.(ShivSena MLA Pratap Saranaik questioned by the ED, interrogation lasted for six hours)

संबंधित बातम्या :

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता

प्रताप सरनाईकांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.