तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, शिवसेना खवळली

तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, अशा शब्दात राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांच्यावर हल्ला चढवलाय.

तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, शिवसेना खवळली
प्रसाद लाड
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 8:28 AM

रत्नागिरी : भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना भवनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं. वेळ आली तर शिवसेना भवन (Shivsena Bhavan) फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी, सेना नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी लाड यांच्यावर टीकेची झोड उठवलीय. त्यानंतर प्रसाद लाड यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत पलटी मारली खरी पण त्यांच्या वक्तव्यावरुन अजूनही टीका सुरुच आहे. राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी प्रसाद लाड यांच्यावर तुफानी हल्ला चढवला. तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, अशा शब्दात राजन साळवींनी लाड यांना प्रत्युत्तर दिलं.

तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील

“आधी आमदारकीचा राजीनामा दे कारण शिवसेनेच्या मतांवरच तू आमदार झालाय… जर हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीला समोर जा मग बघ शिवसैनिक तुझं कसं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील”, अशा शब्दात राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांचा समाचार घेतलाय.

यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं उत्तर जनता निवडणुकीत देईन

शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत ह्यांना भुईसपाट करून देईल, असा हल्ला चढवत वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे, असं उदय सामंत म्हणाले.

नेमका काय प्रकार घडला?

भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसाद लाड यांच्यावर सेना-नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. ज्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा लाड यांनी केला.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

प्रसाद लाड यांची कोलांटउडी!

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेना भवन बद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही.

हे ही वाचा :

“बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण, जनता यांना निवडणुकीत भुईसपाट करणार”

चिथावणीखोर वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची पलटी, माध्यमांनी विपर्यास केल्याचा केल्याचा कांगावा, नेमकं काय घडलं?

…वेळ आली तर सेनाभवन फोडू, प्रसाद लाड यांचं चिथावणीखोर वक्तव्य

बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.