Shambhuraj Desai: 21व्या वर्षी साखर कारखान्याचं अध्यक्षपद, उत्कृष्ट संसदपटू.. शंभूराज देसाईंचा झंझावाती प्रवास

सामाजिक कार्य करत असतानाच जिल्हा परिषदेच्या राजकारणात देसाई यांनी दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर त्यांना 2004 मध्ये शिवसेनेने पाटणमधून पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट दिलं. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दणदणीत विजय मिळवला.

Shambhuraj Desai: 21व्या वर्षी साखर कारखान्याचं अध्यक्षपद, उत्कृष्ट संसदपटू.. शंभूराज देसाईंचा झंझावाती प्रवास
शंभूराज देसाईंचा झंझावाती प्रवास Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 2:53 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी 30 जून रोजी झाला होता. तेव्हापासून गेले सव्वा-दीड महिना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Cabinet Expansion) चर्चा सुरू होती. अखेर 34 दिवसांनंतर राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार आज (9 ऑगस्ट) राजभवनावर पार पडला. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनाही संधी मिळाली. महाविकास आघाडी सरकारमध्ये शंभुराज देसाई यांनी गृहराज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.

कौटुंबिक पार्श्वभूमी

मूळचे साताऱ्याचे असलेल्या शंभूराज देसाई यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1966 रोजी मुंबईत झाला. बी.कॉमपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आहे. पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. देसाई यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

21व्या वर्षी महत्त्वाची जबाबदारी

शंभूराज देसाई यांच्यावर अत्यंत कमी वयात मोठी जबाबदारी आली होती. त्यांचे वडील शिवाजीराव देसाई यांचं निधन झाल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी शंभूराज यांच्यावर बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा आली. आशिया खंडात सहकार क्षेत्रातील सर्वात कमी वयाचे चेअरमन म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. तेव्हापासून देसाई हे सहकार, समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत.

हे सुद्धा वाचा

सामाजिक कार्य

देसाई यांच्या सामाजिक कार्याला 1986 पासूनच सुरुवात झाली होती. साताऱ्यात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. वैद्यकीय शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन असो की ग्रामीण डोंगराळ भागात वैद्यकीय सेवा कार्य सुरू करण्याचं काम असो, प्रत्येक काम त्यांनी अत्यंत चिकाटीने पार पाडलं. दौलतनगर, मरळी, तालुका पाटण या संस्थेतर्फे पॉलिटेनिक कॉलेज, ज्युनिअर व सीनिअर कॉलेज, इंग्लिश मीडिअम स्कूलही त्यांनी सुरू केले.

संस्थांवर कार्यरत

दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरणा शिक्षण संस्था मर्यादित संस्थेचे ते विश्वस्त होते. शिवदौलत सहाकरी बँकेचे संस्थापक, नॅशनल फेडरेशन ऑफ शुगर फॅक्टरी, नवी दिल्लीचे सदस्य, बँक ऑफ महाराष्ट्राचे केंद्रीय प्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

शिवसेनेतून राजकीय प्रवास

पाटण तालुक्यात व सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे संघटनात्मक कार्य करत असतानाच 1995-99 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या काळात सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 1992-1997मध्ये पंचायत समिती पाटणचे ते सदस्य होते. 1992-2002मध्ये जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले.

विधानसभेत पोहोचले

सामाजिक कार्य करत असतानाच जिल्हा परिषदेच्या राजकारणात देसाई यांनी दबदबा निर्माण केला होता. त्यानंतर त्यांना 2004 मध्ये शिवसेनेने पाटणमधून पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट दिलं. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दणदणीत विजय मिळवला. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकर यांचा प्रचंड मतांनी पराभव केला. 2014 आणि 2019 मध्येही पाटणच्या मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून देत विधानसभेत पाठवलं. या काळात त्यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरवण्यात आलं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये देसाई यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यावेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार येताच देसाई यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता शिंदे आणि भाजपच्या सरकारने शंभुराज देसाईंना पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.