2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 ला रिंगणात उतरावं, शिवसेनेचं चॅलेंज

येत्या 2024 च्या निवडणुकीत त्यांनी रिंगणात उतरावं, मग तुम्हाला कळेल, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. (Shivsena MLA Vaibhav Naik Challenge MP Narayan Rane) 

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 ला रिंगणात उतरावं, शिवसेनेचं चॅलेंज
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 4:26 PM

सिंधुदुर्ग : कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना घरी बसवून शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची घोषणा करणारे भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या नारायण राणेंनी येत्या 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं. शिवसेना काय आहे तुम्हाला कळेलच, असं थेट आव्हानच वैभव नाईक यांनी राणे यांना दिलं आहे. (Shivsena MLA Vaibhav Naik Challenge MP Narayan Rane)

“नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 11 आमदार निवडून येणार नाही, असं आव्हान केलं होतं. ते आव्हान शिवसेनेनं 2014 स्वीकारलं आणि 2014 ला राणेंचं आव्हान मोडूनही काढलं. विधानसभेतही त्यांचा पराभव माझ्यासारख्या शिवसैनिकांनी केलाच. पण त्यानंतर त्यांचा मुलाचाही दोन वेळा सलग पराभव शिवसेना आणि कोकणातील जनतेनं केला आहे,” असा टोलाही वैभव नाईक यांनी लगावला.

“नारायण राणेंना माहिती असेल जर गेल्यावेळी राणेंचा मुलगा भाजपमध्ये गेला नसता तर तोही पराभूत झाला असता. खरंतर राणे जेव्हा जेव्हा आव्हान करतात, त्या त्या वेळी ते स्वत: त्यातून पळ काढतात. राणेंनी शिवसेना संपवण्याचे असं म्हटलं होतं. पण आता दुप्पट वेगाने शिवसेना वाढत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे,” असेही वैभव नाईक म्हणाले.

“त्यामुळे राणेंना आमचं आव्हान आहे की, 2019 च्या निवडणुकीत तुम्ही पळ काढलात. 2024 मध्ये तुम्ही निवडणुकीला रिंगणात उतरावं आणि त्यावेळी शिवसेनेचे 11 आमदार येतात की 21 आमदार निवडून येतात हे तुम्हाला समजेल. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत तुम्ही निवडणुकीला उभे राहाचं,” असं खुलं आव्हान शिवसेनेच्यावतीने करतो, असेही वैभव नाईक म्हणाले.

नारायण राणे काय म्हणाले होते?

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अकराही आमदार निवडून येणार नाहीत. सर्वांना घरी बसवण्यात येणार असून कोकणातून शिवसेना हद्दपार करण्यात येईल, अशी गर्जनाच भाजपचे नेते, खासदार नारायण राणे यांनी केली होती.

कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येतील. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा दावाही नारायण राणे यांनी केला होता. शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे  तुमचे आमदार किती असं त्यांना लोक विचारतील. त्यामुळेच ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली होती.  (Shivsena MLA Vaibhav Naik Challenge MP Narayan Rane)

संबंधित बातम्या : 

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार; नारायण राणेंची गर्जना

अशा मूर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे, नितेश राणेंचा राऊतांवर प्रहार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.