AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO| ‘कुणाला राग नको, लोभ नको’, परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेची आयडियाची कल्पना

Sanjay Jadhav | गाव तिथे शिवसेनेची शाखा उभी राहिली पाहिजे. या शाखांवर असणाऱ्या फलकांवरुन आपापसात वाद होऊ नयेत म्हणून अंबादास दानवे यांनी चांगली संकल्पना मांडली आहे. शिवसेना शाखेच्या फलकावर कोणत्याही नेत्याच्या नावाऐवजी फक्त पक्षाचे नाव असेल.

VIDEO| 'कुणाला राग नको, लोभ नको', परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेची आयडियाची कल्पना
संजय जाधव, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 1:18 PM

जालना: आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व हेवेदावे विसरुन एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शिवसेनेचे परभणी खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadav) यांनी केले. कार्यकर्त्यांमध्ये मानापमानाचे राजकारण रंगू नये म्हणून यापुढे जिल्ह्यातील शिवसेना शाखांच्या फलकांवर फक्त पक्षाचेच नाव असेल. जेणेकरून कोणीही नाराज होणार नाही, असे संजय जाधव यांनी म्हटले.

सोशल मीडियावार सध्या संजय जाधव यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये संजय जाधव कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शिवसेनेला चांगले यश मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने गाव तिथे शिवसेनेची शाखा उभी राहिली पाहिजे. या शाखांवर असणाऱ्या फलकांवरुन आपापसात वाद होऊ नयेत म्हणून अंबादास दानवे यांनी चांगली संकल्पना मांडली आहे. शिवसेना शाखेच्या फलकावर कोणत्याही नेत्याच्या नावाऐवजी फक्त पक्षाचे नाव असेल. म्हणजे कोणाच्याही रागलोभाचा प्रश्नच उद्धवणार नाही. नाहीतर फलकावर बबलूचं नाव आलं की उद्धवला राग येतो, उद्धवचं नाव आलं की आप्पाला राग येतो. त्यामुळे शाखेच्या फलकावर फक्त पक्षाचेच नाव लिहणे योग्य ठरेल. शिवसेना म्हटंल की आपल्या सगळ्यांचा समावेश होता, असे संजय जाधव यांनी म्हटले.

‘तर राष्ट्रवादीलाही आम्ही पाया खाली घालू’

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीच्या नाट्यावरून शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचले आहे. वेळ आल्यावर माकडीणही आपल्या पिल्लाला पाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असा इशारा संजय जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार काय? अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खासदार संजय जाधव यांनी जालन्यात शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना हा इशारा दिला आहे. माकडीण सुध्दा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते. आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू. मी फक्त आंचल गोयल प्रकरणी शिफारस केली होती. पण राष्ट्रवादीने रान उठवले. तुम्हाला सगळे जमते. आमचे तेवढे उघडे करता. आता पाणी वर जात आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे. संबंधित बातम्या :

VIDEO | जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना पदभार घेण्यास कोण रोखत होतं? परभणीकरांसाठी पहिल्यांदाच जाहीर कबुली

जिल्हाधिकारीपदी रुजू होण्यासाठी बाळासह परभणीत, आंचल गोयल यांनी अखेर पत्राद्वारे पदभार स्वीकारला

तर राष्ट्रवादीलाही आम्ही पाया खाली घालू, शिवसेना खासदाराचं पदाधिकारी मेळाव्यात जाहीर वक्तव्य, आघाडी बिघडणार?

भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.