Shut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, ‘शट अप या कुणाल’चं निमंत्रण स्वीकारलं

'संजय राऊत सरांनी 'शटअप या कुणाल' या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा सुरु करेन' असं ट्वीट काल कुणाल कामराने केले होते.

Shut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, 'शट अप या कुणाल'चं निमंत्रण स्वीकारलं
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 5:06 PM

मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचे निमंत्रण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्वीकारले. येत्या रविवारी खारमधील स्टुडिओत ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्ट मुलाखतीचे चित्रीकरण पार पडणार आहे. संजय राऊत आणि कुणाल कामरा यांच्यात फोनवर बोलणे झाल्यानंतर हा कार्यक्रम ठरवण्यात आला. (Shivsena MP Sanjay Raut accepts Stand Up Comedian Kunal Kamra’s invite for interview in Shut Up Ya Kunal Season 2)

‘संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा सुरु करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’ असं ट्वीट काल कुणाल कामराने केले होते.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. देवेंद्र फडणवीसांसोबत नुकतीच झालेली भेट असो, किंवा अभिनेत्री कंगना रनौतसोबत त्यांचे उडालेले खटके, सातत्याने चर्चेत असलेल्या राऊतांची मुलाखत घेण्याचा मोह कुणाला कामराला झाल्याचे दिसत आहे. (Shivsena MP Sanjay Raut accepts Stand Up Comedian Kunal Kamra’s invite for interview in Shut Up Ya Kunal Season 2)

नेटिझन्समध्ये कुणाल कामरा चर्चेत

‘शट अप या कुणाल’ हा कुणाल कामराच्या मुलाखतींचा कार्यक्रम नेटिझन्समध्ये लोकप्रिय आहे. त्याने यूट्यूबवर 2017 मध्ये हा शो सुरु केला होता. भाजप यूथ विंगचे उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीने पहिल्या सिझनला सुरुवात झाली होती.

आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या असे नेते सहभागी झाले आहेत.

राज ठाकरेंनाही दिलेले निमंत्रण

याआधी कुणाल कामराने राज ठाकरेंनाही ‘शट अप या कुणाल’साठी आवताण दिले होते. “मी बरंच संशोधन केलं. तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचं लक्षात आलं. म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देतो आहे. जेणेकरुन तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.” असे कुणालने काही महिन्यांपूर्वी ट्वीट केले होते,

संबंधित बातम्या :

‘लाच’ देण्यासाठी कुणाल कामरा राज ठाकरेंच्या घराबाहेर उभा

संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण

(Shivsena MP Sanjay Raut accepts Stand Up Comedian Kunal Kamra’s invite for interview in Shut Up Ya Kunal Season 2)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.