‘बाळासाहेब असते तर…’ कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा

बाळासाहेबांनी काय केलं? हा प्रश्न उपस्थित होत नाही. पण बाळासाहेबांनी काय केलं हे एका वाक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम बाळासाहेबांनी पुढं नेलं. बाळासाहेब नसते तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या. बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला, हिंदुस्तान हिंदुस्तान राहिला. बाळासाहेबांच्या काळात पंतप्रधान कुणी असता तर शेतकरी आडवे आले म्हणून पंतप्रधान परत नसते गेले, अशी जोरदार टोलेबाजी राऊतांनी केलीय.

'बाळासाहेब असते तर...' कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा
संजय राऊत, नरेंद्र मोदीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 8:42 PM

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. या निमित्त आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. आज बाळसाहेब असते तर शेतकरी आडवे आले म्हणून पंतप्रधानांना पंजाबमधून परत जावं लागलं नसतं, असा खोचक टोला राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लगावलाय.

संजय राऊत म्हणाले की, आज बाळासाहेब असते तर 96 वर्षाचे असते. बाळासाहेबांनी तरुणांचे नेतृत्व केलं. आज महाराष्ट्रात आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला भेटण्यासाठी येणारा, शिवसेनेबाबत आस्थेने विचारणारा वर्ग तरुण आहे आणि हिच शिवसेनेची मिळकत आहे. बाळासाहेबांनी काय केलं? हा प्रश्न उपस्थित होत नाही. पण बाळासाहेबांनी काय केलं हे एका वाक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम बाळासाहेबांनी पुढं नेलं. बाळासाहेब नसते तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या. बाळासाहेबांमुळे महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला, हिंदुस्तान हिंदुस्तान राहिला. बाळासाहेबांच्या काळात पंतप्रधान कुणी असता तर शेतकरी आडवे आले म्हणून पंतप्रधान परत नसते गेले, अशी जोरदार टोलेबाजी राऊतांनी केलीय.

कवितेच्या माध्यमातून मोदींवर जोरदार निशाणा

तसंच शेतकऱ्यांची भीती वाटावी असं वातावरण कुणी निर्माण केलं? सवाल उपस्थित करत, एका कवितेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी मोदींवर हल्ला चढवला.

ना कोई जंग लढी है मैंने ना खाना पिना छोडा है मैंने बस अपनेही देश मै जिंदा लोट आया हूँ मैं अपनेही लोगोंसे डरता हूँ मैं काम ही ऐसा करता हूँ मैं सारे देश को बेचकर जिंदा लौट आया हूँ मैं…

‘पाकिस्तानातून धुळीचे लोट आले, हे म्हणतील सरकार बरखास्त करा’

त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना लावण्यात आलेला दंड माफ करण्याच्या मुद्द्यासह अन्य मुद्द्यांवर सरकार बरखास्त करण्याची मागणी चंद्रकांत दादा यांनी राज्यपालांकडे केली. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी भाजपवर खोचक टीका केलीय. गोंधळाचं वातावरण या देशात तयार केलं आहे. विरोधी पक्ष रोज राजभवनात जातो, रोज सरकार बरखास्तीची मागणी करतो. राज्यपालांची वेळ घ्यायची. या ना त्या कारणाने सरकार बरखास्त करायचं, अशी मागणी करायची, याशिवाय दुसरं काहीही काम त्यांच्याकडे नाही. आता पाकिस्तानातून महाराष्ट्रात धुळीचा लोट आला आहे. सगळीकडे प्रदुषण पाहायला मिळतंय. आता उद्या भाजपचे लोक राज्यपालांकडे जातील आणि म्हणतील सरकार बरखास्त करा, असा जोरदार टोला राऊत यांनी भाजपला लगावलाय.

ठाकरे सरकारचं राऊतांकडून कौतुक

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली एक आदर्श सरकार देण्याचं काम शिवसेनेनं केलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सारखे मेरीट लिस्टमध्ये येत आहेत. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज फक्त शिवसेना या सरकारचं नेतृत्व करतेय म्हणून केंद्राची हिंमत नाही. शिवसेना जर या सरकारचं नेतृत्त्व करत नसती, तर हे सरकार टिकलं असतं का, केंद्रानं ते टिकू दिलं असतं का, अशी शंका माझ्या मनात येतेय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाळासाहेबांना अभिवादन केलं, हे तुम्हाला पचलं नाही, म्हणूनही तुम्ही सरकार बरखास्तीची मागणी कराल.

दिल्लीत नेताजींचा पुतळा उभा करत आहात. आम्हीही नेताजींची महती रोज गातो. पण दररोज जो इतिहास बदलण्याचं काम केलं जातंय, की गेल्या 70 वर्षात काहीच झालं नाही, हे म्हणणं चुकीचंय. बाळासाहेबांचा दिल्लीत पुतळा उभारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे, असंही राऊत यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

‘वीज कापण्याशिवाय पर्याय नाही’, नितीन राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; तर शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, शिंदेंचं आश्वासन

‘बाळासाहेब असते तरी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता!’, अशोक चव्हाणांचा दावा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.