क्राईम रिपोर्टर, राजकारणी ते शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ; कोण आहेत खासदार संजय राऊत?

क्राईम रिपोर्टर म्हणूनही संजय राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. | Sanjay Raut Shivsena

क्राईम रिपोर्टर, राजकारणी ते शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ; कोण आहेत खासदार संजय राऊत?
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 3:46 PM

मुंबई: अलीकडच्या काळात शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आपसूकच डोळयांसमोर येणारा चेहरा म्हणजे संजय राऊत. 2019 च्या सत्तानाट्यापासून संजय राऊत यांचा (Sanjay Raut) शब्द म्हणजेच शिवसेनेची भूमिका असे जणूकाही समीकरणच तयार झाले आहे. राज्यसभेत खासदार असलेल्या संजय राऊत यांनी गेल्या दोन वर्षांत सर्वांनाच नव्याने आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. (Shivsena MP Sanjay Raut Political journey)

2019 च्या सत्तानाट्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणणाऱ्या दोन नेत्यांपैकी एक म्हणजे संजय राऊत. या संपूर्ण काळात भाजपने अनेकप्रकारे शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय राऊत यांनी सातत्याने पत्रकारपरिषदा घेत भाजपच्या ‘अरे’ ला ‘कारे’ ने प्रत्युत्तर देऊन प्रत्येक वार पलवटून राहिला. तेव्हापासून संजय राऊत यांनी शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची जागा काबीज केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेत असणाऱ्या इतर प्रमुख नेत्यांच्या तुलनेत संजय राऊत यांनी बराच पुढचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आजघडीला शिवसेनेच्या संघटनात्मक राजकारणात संजय राऊत यांचा दबदबा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

कोण आहेत संजय राऊत?

संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबागमध्ये झाला. त्यांनी वडाळ्याच्या आंबेडकर महाविद्यालयातून बी.कॉमची पदवी घेतली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.

क्राईम रिपोर्टर ते नेता

संजय राऊत यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही पत्रकारितेपासून झाली. सुरुवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करणारे संजय राऊत पुढे मार्केटिंग विभागात काम करू लागले. त्यानंतर राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहत होते. क्राईम रिपोर्टर म्हणूनही संजय राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. या काळात त्यांनी अनेक सनसनाटी बातम्यांचे वृत्तांकन केले होते. या काळात संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत भरले. संजय राऊत यांची भूमिका शिवसेनेशी मिळतीजुळती असल्याचे बाळासाहेबांना वाटायचे. त्यामुळे दैनिक सामना सुरु झाल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना बोलावून घेतले. 1989 ला सामना सुरू झाला तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते. त्यांच्यानंतर संजय राऊत 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू झाले.

शिवसेनेत विशेष स्थान

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून संजय राऊत शिवसेनेत आहेत. मात्र, अजूनही ते कालबाह्य किंवा बाजूला सारले गेलेले नाहीत. संजय राऊत यांनी आजपर्यंत थेट कोणती निवडणूक लढवली नसली तरी मातोश्रीच्या दरबारातील त्यांचे स्थान आजही कायम आहे. परिस्थितीची, काळाची गरज ओळखून ते पक्षासाठी भूमिका घेतात, हे पक्षाला माहीत आहे.

बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे अशा तिन्ही पिढ्यांसोबत जुळवून घ्यायचे कौशल्य संजय राऊत यांनी आत्मसात केले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सामनाचे संपूर्ण अधिकार संजय राऊत यांच्या हातात देण्यात आले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला दम भरणारा नेता

संजय राऊत यांनी स्वत:च एका मुलाखतीमध्ये आपण कुख्यात गुंड दाऊदशी बोलल्याचे सांगितले होते. आता अंडरवर्ल्ड राहिलेलं नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील अंडरवर्ल्ड काय होतं हो आम्ही पाहिलेलं आहे. त्या काळात मुंबईचं अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या. लोक मला एकेकाळी गुंड म्हणत असत. मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्यांच्याशी बोललोय, इतकेच नाही त्याला मी दमही दिला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले होते.

राज ठाकरेंचं राजीनामापत्र लिहिलं

राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत असताना त्यांचं पत्र संजय राऊत यांनी लिहिलं होतं. बाळासाहेबांना राऊत यांच्या लिखाणाची शैली माहीत होती. राज यांचं राजीनामापत्र बाळासाहेबांच्या हातात पडताच त्यांनी ते संजय राऊत यांनी लिहिल्याचं ओळखलं. संजय, हे तुझंच काम दिसतंय असं ते म्हणाले होते. नंतर राज ठाकरेंना समजवण्यासाठी मनोहर जोशी आणि संजय राऊत गेले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली होती. त्यावेळी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, ऐनवेळी संजय राऊत यांनी माघार घेऊन शिवसेनेतच राहणे पसंत केल्याचे सांगितले जाते.

(Shivsena MP Sanjay Raut Political journey)

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.