AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका! विनायक राऊत नारायण राणेंविरोधात सूमोटो कारवाईची मागणी करणार, नेमकं प्रकरण काय?

सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत एक हजार एकर जागा स्वत:च्या नातेवाईकांच्या हॉटेल्सना दिली आहे. नातेवाईकांच्या हॉटेल्ससाठी जागा हडप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राणेंसारखा सत्तापिपासू माणूस करतोय. याची दखल सिंधुदुर्गवासीय घेतील, असा इशाराही विनायक राऊत यांनी राणेंना दिलाय.

कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका! विनायक राऊत नारायण राणेंविरोधात सूमोटो कारवाईची मागणी करणार, नेमकं प्रकरण काय?
विनायक राऊत, नारायण राणे
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 3:21 PM

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील संघर्ष काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. राणे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांना दम भरला. त्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर सूमोटो कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचं म्हटलंय. कार्यकर्त्यांच्या जीवितास धोका पोहचू शकतो. त्यामुळे पोलिसांनी या धमकीचा अभ्यास करुन सूमोटो कारवाई करावी, अशी मागणी खासदार राऊत यांनी केलीय. (Vinayak Raut criticizes Narayan Rane for giving warning to Party activists)

नाणार रिफायनरी प्रकल्पाला काही वर्षांपूर्वी याच नारायण राणे आणि नितेश राणे यांनी विरोध करताना आंदोलनाला धार चढवली होती. कात्रादेवीच्या साक्षीने शपथ घेतली होती की मी कोणत्याही परिस्थितीत नाणार रिफायनरी होऊ देणार नाही. आता राणेंना भाजपमध्ये जाऊन काय उपरती झाली? स्वार्थासाठी सर्व विसरायचं आणि लोकांचा विश्वासघात करायचा ही राणेंची प्रवृत्ती आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत एक हजार एकर जागा स्वत:च्या नातेवाईकांच्या हॉटेल्सना दिली आहे. नातेवाईकांच्या हॉटेल्ससाठी जागा हडप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न राणेंसारखा सत्तापिपासू माणूस करतोय. याची दखल सिंधुदुर्गवासीय घेतील, असा इशाराही विनायक राऊत यांनी राणेंना दिलाय.

2024ची निवडणूक जिंकणारच- निलेश राणे

दरम्यान, काल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी 2024च्या निवडणुकीत मी जिंकणारच असाता दावा केलाय. कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. निलेश राणे यांनी कुडाळ, मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचं बिगूल वाजवलं. निलेश राणे निवडणुकीबाबत घोषणा करतात सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून आणि घोषणाबाजी करत जोरदार प्रतिसाद दिला.

‘हकालपट्टी सोडाच, दुसरं काही करायला लावू नका’

दरम्यान, निलेश राणे यांच्या निवडणुकीबाबतच्या घोषणेच्या अनुषंगाने नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरल्याचं पाहायला मिळालं. आगामी निवडणुकीत गद्दारी अजिबात खपवून घेणार नाही. मागील निवडणुकीत जे झालं ते मी सहन केलं. मात्र, पुढच्या निवडणुकीत कुमी गद्दारी केली तर हकालपट्टी सोडाच, पण दुसरं काही करायला लावू नका, अशा शब्दात नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिलाय.

हिंमत असेल तर रिफायनरीचा प्रस्ताव रेटून दाखवा, राऊतांचं आव्हान

नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका केलीय. नाणार रिफानरी प्रकल्प होऊ नये म्हणून संपूर्ण देवगडमधून गाड्या भरुन मोर्चे काढले होते. त्यावेळी राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली होती. आता सरकारमध्ये बसल्यानंतर त्यांना रिफायनरीचा कळवळा आलाय. पण हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरीचा प्रस्ताव रेटून दाखवावा, असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलंय.

इतर बातम्या :

Video : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! खासदार उदयनराजे म्हणतात, ‘गरीब शेतकरी सभासदांची जिरवू नका’

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल’, पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्र सरकारवर निशाणा

Vinayak Raut criticizes Narayan Rane for giving warning to Party activists

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.