आम्हाला ‘खासदार’ हवाय, ‘गुंड’ नकोय, उद्धव ठाकरेंचा निलेश राणेंवर हल्लाबोल

देवरुख (रत्नागिरी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवरुखमधील जाहीर सभेतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. राणे कुटुंबाचा प्रत्यक्ष उल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांनी राणेंवर हल्लाबोल केला. काय म्हणाले उद्धव ठाकरे? रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात कुणीतरी घरात झेंड्याचं दुकान काढलंय, असा टोला लगावत उद्धव ठाकरे […]

आम्हाला 'खासदार' हवाय, 'गुंड' नकोय, उद्धव ठाकरेंचा निलेश राणेंवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

देवरुख (रत्नागिरी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवरुखमधील जाहीर सभेतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. राणे कुटुंबाचा प्रत्यक्ष उल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांनी राणेंवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात कुणीतरी घरात झेंड्याचं दुकान काढलंय, असा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्य राणे कुटुंबाचा समाचार घेतला. तसेच, एकाच कुटुंबातील लोक वेगवेगळे झेंडे घेऊन फिरत असल्याची उपहासात्मक टीका करत उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानीचे उमेदवार निलेश राणे यांचा समाचार घेतला.

शिक्षणापेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत. आम्हाला खासदार हवाय, पण गुंड खासदार नकोय, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी डॉ. निलेश राणे यांच्यावर केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांचा ‘नालायक कार्टं’ असा उल्लेख केला. “सावरकरांचा अवमान करणाऱ्या नेभळट राहुल गांधीला वीर बोलायचे का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तर साठ वर्ष देशावर दरोडे घालणाऱ्या दरोडेखोरांनी दुसऱ्याला चोर म्हणण्याचा अधिकार काय, असा उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत काँग्रेसला फटकारलं.

उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील देवरुख येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाकडून डॉ. निलेश राणे, तर काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर रिंगणात आहेत.

पाहा व्हिडीओ :

'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.