“बेस्टच्या ताफ्यात अशी बस असतानाही गुजरातहून का आणली?” संजय राऊतांचा संताप; म्हणाले “महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्यासाठी…”

जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती, तेवढी क्षमता मुंबईत आहे. खास गुजरातहून बस पाठवण्यात आली. गुजरात आहे म्हणून देश आहे, असे दाखवताय का?" असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

बेस्टच्या ताफ्यात अशी बस असतानाही गुजरातहून का आणली? संजय राऊतांचा संताप; म्हणाले महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्यासाठी...
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 10:56 AM

Sanjay Raut On Gujarat Open Deck Bus : टी 20 विश्वचषकातील विजेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाली. यानंतर भारतीय संघाचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईतील नरीमन पाईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत त्यांचे विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक ओपन बस तयार करण्यात आली होती. ही बस गुजरातला बनवल्याचे त्याच्या नंबर प्लेटवरुन समोर आले आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर जोरदार निशाणा साधला.

“बेस्टच्या ताफ्यात अशा प्रकारच्या बस आहेत. जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती, तेवढी क्षमता मुंबईत आहे. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईत सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न

“हा महाराष्ट्राला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्याआधीही वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय टीम जेव्हा मुंबईत आली होती, तेव्हा या ठिकाणच्या बस, गाड्यांचा वापर जल्लोष करण्यासाठी केला जात होता. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. संपूर्ण देशात सर्व काही गुजरात आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुजरात आहे म्हणून देश आहे, हे दाखवण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

MCA ने आक्षेप घ्यायला हवा होता

“मुंबईत बेस्टच्या किंवा इतर खासगी बसेस आहेत. याआधीही मुंबईत जेव्हा अशा प्रकारचा जल्लोष झाला होता. महाराष्ट्र हे औद्योगिक केंद्र आहे. या ठिकाणी सर्व काही आहे, उलट तुम्ही आमच्याकडून शिकला आहात. मुंबई क्रिकेट असोसिएशनने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला हवं होतं. तुमच्या क्रिकेट असोसिएशनच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर अनेक मराठी लोक आहेत. त्यात शिवसेनेचीही लोक आहेत. त्यांनी यावर आक्षेप घ्यायला हवा होता”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

गुजरात आहे म्हणून देश आहे, असे दाखवताय का?

“मुंबईत क्रिकेटपटूंचे आगमन होतंय, रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे. अनेक खेळाडू हे मुंबई इंडियन्सचे आहेत. मग त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातहून बस आणावी लागते, याद्वारे तुम्ही काय दाखवू इच्छिता. यापूर्वीही अशाप्रकारे उत्सव झाले तेव्हा मुंबईने जोरदार स्वागत केले आहे. बेस्टच्या ताफ्यात अशा प्रकारच्या बस आहेत. जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती, तेवढी क्षमता मुंबईत आहे. खास गुजरातहून बस पाठवण्यात आली. गुजरात आहे म्हणून देश आहे, असे दाखवताय का?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

“वाराणसीमध्ये मोदींचा पराभव होता होता राहिला. मुंबईतही भाजपचा झालेला दारुण पराभव यामुळेच झालेला आहे. मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत सर्व काही आहे. मुंबईतूनच पैसा गुजरातला जातो. इथूनच लूट होते आणि तिथे जाते. एक बस आली म्हणून इतकं काही नाही, पण यातून वृत्ती दिसते. आमचं गुजराती भाषेशी, समाजाशी काहीही भांडण नाही. हे वारंवार मी सांगितलं आहे. मुंबईत मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहांनी लावला आहे. आम्ही तो वाद लावलेला नाही. मराठी आणि गुजराती हा वाद नाही. तो कधी असूच शकत नाही. मुंबईत सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात. हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.