Maratha Reservation | आम्ही हात जोडून विनंती केलीय, आता निर्णय पंतप्रधान मोदी घेतील : संजय राऊत
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. (Shivsena Sanjay Raut on PM Modi CM Uddhav Thackeray meet Maratha Reservation)
नाशिक : “मराठा आरक्षण प्रश्नी काढण्यात येणारा मोर्चा हा दिल्लीत काढायला हवा. मराठा आरक्षणाबद्दल आम्ही हात जोडून विनंती केली आहे. मात्र आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shivsena Sanjay Raut on PM Modi CM Uddhav Thackeray meet Maratha Reservation)
“मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती”
“मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीवरुन संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. त्यावर आता ते पुढील निर्णय घेतील,” असे राऊतांनी सांगितले.
“मराठा मोर्चा दिल्लीत काढायला हवा”
“मराठा आरक्षणाप्रश्नी जर मोर्चा निघणार असेल तर तो दिल्लीत काढायला हवा. महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये. एक मराठा लाख मराठा दिल्लीत दिसायला हवा,” असेही राऊतांनी ठणकावले.
पक्षसंघटनेचं काम चांगलं सुरु
आगामी काळात, कोणत्या दिशेने जायच आहे, त्यानुसार काम सुरू आहे संघटनेला गती मिळण्यासाठी हा दौरा आहे. उत्तर महाराष्ट्रच योगदान महत्वाचं आहे. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्र साथ गरजेची आहे. शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावं, आमचे सर्व लोक चांगलं काम करतात.आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होतंय.पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावं. आमचे सर्व लोक चांगलं काम करतात. आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होतंय, अनुभवी लोकांची समिती स्थापन करु असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठा आरक्षणावर सुमारे 1 तास 45 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे. सर्व विषय मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रंही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले. त्याबाबत मोदींनी लक्ष घालतो असं सांगितलं. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.(Shivsena Sanjay Raut on PM Modi CM Uddhav Thackeray meet Maratha Reservation)
संबंधित बातम्या :
सत्ता असेल किंवा नसेल आम्ही गुलामगिरीत जगत नाही, शिवसेनेसाठी स्वाभिमान महत्वाचा: संजय राऊत
संजय राऊत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करतायत?; वाचा सविस्तर