Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांनी चंद्रकांतदादांच्या दुसऱ्या नसेवर बोट ठेवलंच!

चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं... तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक वार केला. 

'तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?', राऊतांनी चंद्रकांतदादांच्या दुसऱ्या नसेवर बोट ठेवलंच!
संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 9:35 AM

नवी दिल्ली :  येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी (Sanjay Raut) निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं… तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक वार केला.

चंद्रकांतदादा कोल्हापूर सोडून कोथरुडला आले,आम्ही काही बोललो का?

“मी काय कराव हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं… माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे…”, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांतदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला. “पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली तिकडे मी असणारच… आणि ती जबाबदारी नेटाने पार पाडणार”, असं संजय राऊत म्हणाले.

“तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले… आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू… तुम्ही तुमच बघा”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्या महापालिका निवडणूक लढण्याच्या चॅलेंजला संजत राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांतदादांचं राऊतांना निवडणूक लढण्याचं आव्हान

जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं.

संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही

“जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी. मराठीमध्ये एक म्हण आहे, दंड थोपटले…. संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी”, असा हल्लाबोल चंद्रकांतदादांनी राऊतांवर केला.

भाजप आणि मनसेने एकत्र येऊन लढून दाखवावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर बोलताना दिली होती. राऊतांची हीच प्रतिक्रिया चंद्रकांतदादांना झोंबली. त्यांनी राऊतांवर थेट हल्ला चढवत आपले दंड तपासण्याचा सल्ला दिला.

(Shivsena Sanjay Raut reply Chandrakant Patil Over Political Challenge)

हे ही वाचा :

जर मुंबईत सेनेची ताकद तर महापालिकेची निवडणूक लढवा, राज ठाकरेंच्या अंगणातून चंद्रकांतदादांचं राऊतांना चॅलेंज

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.