हिंगोलीत शिवसेनेचा उमेदवारच भाजपमध्ये गेला, नव्या उमेदवारासाठी शोधाशोध
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी राजकीय गणितं शिवसेनेच्याच 2014 च्या उमेदवाराने बदलली आहेत. कारण 2014 साली शिवसेनेकडून ज्यांनी हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली होती, ते सुभाष वानखेडे आता भाजपच्या गोटात सामिल झाले होते. मात्र, युती झाल्याने सुभाष वानखेडेंना आपलं वेगळं अस्तित्त्व दाखवता येणार नसले, तरी […]
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी राजकीय गणितं शिवसेनेच्याच 2014 च्या उमेदवाराने बदलली आहेत. कारण 2014 साली शिवसेनेकडून ज्यांनी हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली होती, ते सुभाष वानखेडे आता भाजपच्या गोटात सामिल झाले होते. मात्र, युती झाल्याने सुभाष वानखेडेंना आपलं वेगळं अस्तित्त्व दाखवता येणार नसले, तरी अंतर्गत गटबाजीचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे.
सेनेचा उमेदवार भाजपमध्ये!
2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून सुभाष वानखेडे उमेदवार होते. मात्र, शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे सुभाष वानखेडे पराभूत झाले आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
नव्या उमेदवाराची सेनेकडून शोधाशोध
शिवसेना-भाजप युतीच्या फॉर्म्युल्यानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला येते. त्यामुळे शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी हिंगोलीतून उमेदवाराची शोधाशोध सुरु केली आहे. वसमतचे विद्यमान आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, नांदेडचे आमदार हेमंत पाटील, डॉ. बी. डी. चव्हाण यांची नावे शिवसेनेच्या गोटात सध्या चर्चेत आहेत.
काँग्रेसचं हिंगोलीत वर्चस्व
2014 साली मोदी लाट असूनही हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते राजीव सातव हे जिंकले. राजीव सातव हे 1632 मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसची हिंगोलीत ताकद आहे. 2014 साली राज्यात काँग्रेसच्या दोनच जागा निवडून आल्या, त्यात एक नांदेडची होती आणि दुसरी हिंगोलीची. त्यामुळे हिंगोलीतून काँग्रेस विजयाची खात्री बाळगून असते. अशा काळात शिवसेनेसमोर मोठं आव्हान असेल.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या :
लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती