…तर मी अध्यक्ष होण्यास तयार, पण सेनेनं वनमंत्रिपद सोडू नये, भास्कर जाधवांचं वक्तव्य

शिवसेनेकडे आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

...तर मी अध्यक्ष होण्यास तयार, पण सेनेनं वनमंत्रिपद सोडू नये, भास्कर जाधवांचं वक्तव्य
भास्कर जाधव
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 10:05 PM

गुहागरः महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच सेनेने स्वीकारावं, असं भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणालेत. तसेच तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असंही त्यांनी सांगितलंय. भास्कर जाधव गुहागरमध्ये बोलत होते. शिवसेनेकडे आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. (ShivSena Should Not Give Up The Post Of Forest Minister In Exchange For The Post Of Vidhan Sabha President, Advises Bhaskar Jadhav)

शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये

कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं हे तिन्ही पक्षांनी मिळून ठरवायचं असतं. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालंय. शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम आहे. शिवसेनेकडे वनखातं तसंच ठेवून जर अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावं. एक तर शिवसेनेकडे महत्त्वाची खातीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावं असं मला वाटत नाही, असंही भास्कर जाधवांनी स्पष्ट केलंय.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा

तर गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला होता. इतकंच नाही तर अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला होता. त्यानंतर अखेर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले होते. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं भास्कर जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन भास्कर जाधव यांनी चांगलंच गाजवलं

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन भास्कर जाधव यांनी चांगलंच गाजवलं होतं. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर भाजप नेते सरकारला धारेवर धरणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीचा काही काळ तसं चित्रही पाहायला मिळालं होतं. मात्र भास्कर जाधव जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून बसले, त्यावेळी सभागृहातील चित्रच पालंटलं होतं. जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. सभागृहातील जाधव यांच्या पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत होता. त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

Maharashtra New Ministers : राणे, पाटील, कराड आणि पवारांना मोदींच्या टीममध्ये स्थान, राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

Maharashtra New Ministers: ‘मै नारायण तातू राणे… ईश्वर की शपथ लेता हूँ की…’; नारायण राणेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

ShivSena Should Not Give Up The Post Of Forest Minister In Exchange For The Post Of Vidhan Sabha President, Advises Bhaskar Jadhav

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.