‘जिथे फडणवीस गेले तिथे भाजपचा पराभव’, शिवसेनेचा ‘सामना’तून भाजपवर निशाणा
मुंबई : “महाराष्ट्राची सत्ता हेच भाजपचे टॉनिक होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे”, असा टोला शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून भाजपला लगावला आहे (Shivsena slams BJP). जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. त्यामुळे भाजप आता काय करणार? असा सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे (Shivsena slams BJP). विधानसभा निवडणुकांनंतर नुकतेच नागपूर, […]
मुंबई : “महाराष्ट्राची सत्ता हेच भाजपचे टॉनिक होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे”, असा टोला शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून भाजपला लगावला आहे (Shivsena slams BJP). जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सहापैकी पाच जिल्ह्यातून भाजपला नाकारण्यात आले. त्यामुळे भाजप आता काय करणार? असा सवाल शिवसेनेने भाजपला विचारला आहे (Shivsena slams BJP).
विधानसभा निवडणुकांनंतर नुकतेच नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशीम, पालघर, अकोला अशा सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजपला मागे टाकत महाविकास आघाडीने पुन्हा मुसंडी मारली. धुळे वगळता इतर पाच जिल्ह्यांमध्ये भाजपचा पराभव झाला. याच पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला.
नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल हा सगळ्यात धक्कादायक आणि सनसनाटी लागला असल्याचे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. ‘देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली. भाजपचा दारुण पराभव हा फडणवीस, गडकरींच्या गावातच झाला’, असे देखील शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.
नागपूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर टीका केली होती. काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा विसरली, असे गडकरी म्हणाले होते. यावर देखील शिवसेनेने अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले.
“शिवसेना काँग्रेसच्या रंगात रंगली असून भगवा रंग विसरली असल्याची गरळ गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ओकली होती. पण नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला असतानाही गडकरी-फडणवीस तेथील भाजपचा पराभव का थांबवू शकले नाहीत? याचेकारण, एकच ग्रामीण भागातील जनता तुमच्या रोजच्या बकवास थापेबाजीला कंटाळली आहे”, असे शिवसेनी अग्रलेखात म्हणाली.
यापुढे अग्रलेखात म्हटले आहे की, “विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने नागपुरात मुसंडी मारली होती आणि आता जिल्हा परिषदही भाजपकडून हिसकावून घेतली. नागपुरातील पराभव हा सर्वात मोठा दणका आहे.” नागपुरात जिथे जिथे फडणवीस गेले तिथे तिथे भाजप उमेदवाराचा पराभव व्हावा, यास काय म्हणावे? असा सवाल शिवसेनेने ‘सामना’ अग्रलेखातून भाजपला विचारला.