ठाकरे गट रस्त्यावर! मुंबई, नाशिक, औरंगाबादेत लोढांविरोधात आंदोलन, चौथीचं पुस्तक भेट, राजीनामा द्या, अन्यथा… काय दिला इशारा?
मंगल प्रभात लोढा यांना चौथीतल्या इतिहासाचं पुस्तक यावेळी भेट म्हणून देणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं.
मुंबईः केंद्रीय पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray) गट चांगलाच आक्रमक झाला आहे. मुंबई आणि औरंगाबादेत शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन केलं जातंय. छत्रपती शिवरायांची तुलना एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याशी करणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांनी आधी राजीामा द्यावा. अन्यथा त्यांना मुंबईत फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आलाय. मुंबईत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
मंगल प्रभात लोढा यांना चौथीतल्या इतिहासाचं पुस्तक यावेळी भेट म्हणून देणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. हे पुस्तक वाचलं तरी छत्रपती शिवरायांचा नेमका इतिहास त्यांना कळून जाईल, असं मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं.
औरंगाबादमध्येही ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आहे. सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे आज औरंगाबादेत चक्का जाम आंदोलन करण्यात आलं, असं अंबादास दानवे म्हणाले.
राज्यात मोघलाई आहे, एकीकडे सरकार सांगतं एक बील भरा.. .पण शेतकऱ्याला एक बिल भरणं आताच्या घडीला शक्य नाही. सरकराला कुठलीही भाषा कळत नाही, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला, असं अंबादास दानवे म्हणाले.
नाशिकमध्येही आंदोलन…
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला गेला. नाशिकरोड शिव जन्मोत्सव समितीच्यावतीने अभिनव आंदोलन करण्यात आलं.. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्यासाठी थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहिले.. यावेळी एक प्रतिकात्मक पत्रपेटी तयार करण्यात आली असून या पत्रपेटीमध्ये हजारहून अधिक पत्र जमा करण्यात आले आहेत..