Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूळचे शिवसैनिक, भाजपचे कट्टर विरोधक; अशी आहे विजय वडेट्टीवारांची राजकीय कारकिर्द

मूळचे शिवसैनिक आणि भाजपचे कट्टर विरोधक अशी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. (shivsena to congress, read maharashtra minister vijay wadettiwars political journey)

मूळचे शिवसैनिक, भाजपचे कट्टर विरोधक; अशी आहे विजय वडेट्टीवारांची राजकीय कारकिर्द
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:52 PM

मुंबई: मूळचे शिवसैनिक आणि भाजपचे कट्टर विरोधक अशी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. तसेच ओबीसींचे नेते म्हणूनही त्यांनी आपली ओळख प्रस्थापति केली आहे. काँग्रेसचे अभ्यासू आणि आक्रमक नेते, विदर्भातील मोठं व्यक्तिमत्व असलेल्या वडेट्टीवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा… (shivsena to congress, read maharashtra minister vijay wadettiwars political journey)

कौटुंबीक पार्श्वभूमी आणि राजकीय सुरुवात

विजय नामदेवराव वडेट्टीवार हे चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावचे. वडेट्टीवार यांच्या राजकारणाला विद्यार्थी चळवळीपासून झाली. 1980 ते 1981 पर्यंत ते एनएसयूआयमध्ये सक्रिय होते. एनएसयूआयमध्ये सक्रिय असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सक्रिय राजकारणात आल्यानंतर विदर्भामध्ये भाजपला कडाडून विरोध करणारे नेते म्हणून त्यांनी अल्पावधीतच ओळख निर्माण केली होती. सध्या ते काँग्रेसचे चंद्रपुरातील ब्रम्हपूरचे आमदार आहेत. काँग्रेसचे विधानसभेतील ओबीसी समितीचे सदस्यही आहेत

शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री

वडेट्टीवार हे मूळचे शिवसैनिक होते. त्यांनी काही काळ शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणूनही काम पाहिलं. मात्र नारायण राणे यांनी बंड केल्यानंतर राणे समर्थक असलेल्या वडेट्टीवारांनीही काँग्रेसची वाट धरली. काँग्रेसमध्ये आल्यानंतर वडेट्टीवारांनी स्वत:चा गट तयार केला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणावर ताबा मिळवला. शिवसैनिक ते थेट ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

जिल्हा परिषद सदस्य ते विरोधी पक्षनेते

1991 ते 93 दरम्यान वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 1996-98 मध्ये युतीचे सरकार असताना ते वनविकास महामंडळाचे चेअरमन होते. 1998 ते 2004 या दरम्यान ते विधानपरिषदेवर निवडून गेले. 2004 मध्ये ते चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 2008 -09 मध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्रिपद भूषवलं होतं. शिवाय ते आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीही होते. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभेतून ते दुसऱ्यांदा विजयी झाले. 2010मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. 2014 मध्ये त्यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून बहुमताने विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 24 जून 2019 रोजी वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांची पक्षातील उंचीही वाढली होती.

पक्षातील वजन वाढले

वडेट्टीवार यांनी विविध समित्यांवर आणि शैक्षणिक क्षेत्रातही मोठं कार्य केलं आहे. काँग्रेस नेत्यांच्या कोअर कमिटीतही वडेट्टीवार होते. दिल्लीतील बैठकीतही त्यांना पक्षाने बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली होती. यामुळे त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागेल, हे नक्की होते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देतानाच चांगले खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खातेवाटपात त्यांना चांगले खाते न मिळाल्याने ते नाराज आहेत.

ओबीसींच्या आरक्षणासाठी आक्रमक

राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालेली असतानाच ओबीसी समाजाने आरक्षणासाठी मोर्चे सुरू केले. यावेळी वडेट्टीवार यांनी ओबीसींची बाजू लावून धरत ओबीसींची भूमिका आक्रमकपणे मांडली. त्यामुळे ओबीसींचे नेते म्हणून प्रतिमा तयार करण्यास ते यशस्वी ठरले आहेत. वडेट्टीवार हे ओबीसी असून ओबीसी समाजाच आपल्या नेतृत्वात आणण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. (shivsena to congress, read maharashtra minister vijay wadettiwars political journey)

विजय वडेट्टीवारांचा अल्प परिचय

1980-1981 – एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेत सक्रिय

1991 -1993 – गडचिरोली जिल्हा परिषदेत सल्लागार

1991 -1998 – महाराष्ट्र उपक्रमांचे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष

1998-2004 – विधान परिषदेवर निवड

2004-2009- चिमूर विधानसभा मतदारसंघातून विजयी

2008-2009- सिंचन, आदिवासी कल्याण, पर्यावरण आणि वन राज्यमंत्री

2009 -2010- पुन्हा चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवड

2009-2009 नोव्हेंबर- सिंचन, ऊर्जा, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री

2010-2011- अध्यक्ष, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, चंद्रपूर

2008-2011- संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई

2014 – ब्रह्ममपूरी विधानसभा मतदारसंघातून विजयी

2019- ब्रह्ममपूरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी (shivsena to congress, read maharashtra minister vijay wadettiwars political journey)

संबंधित बातम्या:

शिवसेनेचे ‘संकटमोचक’ आणि ठाकरेंचे विश्वासू; वाचा, अनिल परब यांचा पॉलिटिकल ग्राफ!

71 कोटींचा बँक घोटाळा; वाचा, कोण आहेत आमदार अनिल भोसले!

पाचवेळा आमदार, तरीही पक्षातच ‘उपरे’ ठरविले गेले; वाचा, प्रकाश भारसाकळेंचा संघर्ष

विद्यार्थी नेता ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते; वाचा, प्रवीण दरेकर यांच्या आयुष्यातील ‘खाचखळगे’!

‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते ‘शिवसेनेची रणरागिणी’, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर

(shivsena to congress, read maharashtra minister vijay wadettiwars political journey)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.