‘आता आतुरता…’, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर रिलीज
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा होतोय. या मेळाव्याचं पोस्टर रिलीज झालं आहे.
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा (Dasara Melava) होतोय. या मेळाव्याचं पोस्टर रिलीज झालं आहे. यावर “आतुरता उद्धवसाहेबांच्या गर्जनेची”, असं लिहिण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो या पोस्टरवर लावण्यात आले आहेत. सत्तांतरनंतर होणाऱ्या या मेळाव्यात विरोधीपक्ष भाजप आणि विशेषत: शिंदेगटावर तोफ डागली जाणार सर्वश्रृत आहे. आता फक्त उद्धव ठाकरे कोणत्या पद्धतीने बोलणार, कोणते शब्द वापरणार, हे पाहणं महत्वाचं आहे.