Video : मुंबईत शिवसेना-भाजप नगरसेवक आमनेसामने! यशवंत जाधवांना भाजप नगरसेवकांनी घेरलं
नायर रुग्णालयात उपचाराअभावी 4 महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. हे बाळ त्याच्या परिवारासह वरळीतील सिलिंडर ब्लास्टच्या (Cylinder Blast) घटनेत जखमी झालं होतं. या घटनेवरुन भाजप नगरसेवकानं आरोग्य समितीचा राजीनामा दिली होता. त्याविषयी बोलताना यशवंत जाधव यांनी भाजपचे लोक राजीनामा देतात, आम्ही सेनेचे लोक मात्र लढतो, असं वक्तव्य केलं होतं. जाधवांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नगरसेवक चिडले आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने आले होते.
मुंबई : महपालिकेच्या सभागृहाबाहेर भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांना भाजप नगरसेवकांनी घेरल्याचं पाहायला मिळालं. नायर रुग्णालयात उपचाराअभावी 4 महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. हे बाळ त्याच्या परिवारासह वरळीतील सिलिंडर ब्लास्टच्या (Cylinder Blast) घटनेत जखमी झालं होतं. या घटनेवरुन भाजप नगरसेवकानं आरोग्य समितीचा राजीनामा दिली होता. त्याविषयी बोलताना यशवंत जाधव यांनी भाजपचे लोक राजीनामा देतात, आम्ही सेनेचे लोक मात्र लढतो, असं वक्तव्य केलं होतं. जाधवांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नगरसेवक चिडले आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने आले होते.
आण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेर हा राडा पाहायला मिळाला. दोन्ही बाजूच्या नगरसेवकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणबाजी झाली. नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव गेल्याचा आरोप भाजपनं केलाय. या घटनेचा भाजपकडून निषेधही करण्यात आलाय. तसंच भाजप नगरसेवकांने आरोग्य समितीचाही राजीनामा दिला आहे. याबाबत यशवंत जाधव यांनी महापौरांनी कारवाईचे आदेश दिल्याचं सांगितलं. पण भाजपकडून राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
वरळीत घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट
वरळीतील कामगार वसाहत येथील बीडीडी चाळ क्रमांक 3 मधील एका घरात तीन दिवसांपूर्वी सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली. आगीची घटना कळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं होतं. मात्र, या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले होते. यात एका चार महिन्याच्या बाळाचाही समावेश होता. जखमी झालेल्या चौघांना मुंबई सेंट्रल इथल्या पालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने या कुटूंबाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यातच चिमुकल्याचा मृत्यू झाला.
इतर बातम्या :