शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांचा एक मार्चला काँग्रेस प्रवेश?
जालना : जालना जिल्ह्याीतल शिवसेनेचे मोठे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे येत्या एक मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. एक मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत जाहीर सभा आहे. याच सभेत अर्जुन खोतकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची शक्यता […]
जालना : जालना जिल्ह्याीतल शिवसेनेचे मोठे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे येत्या एक मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. एक मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत जाहीर सभा आहे. याच सभेत अर्जुन खोतकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अर्जुन खोतकर हे ‘1’ अंक शुभ मानतात आणि 1 मार्च रोजी राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे एक मार्चलाच खोतकरांच्या काँग्रेस प्रवेशाची शक्यता आहे.
दुसरीकडे, शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुर आहेत. मात्र, काँग्रेसच्या जिल्हास्तरीय प्रतिनिधींना याबाबत काहीही माहिती नसल्याचं समोर येत आहे.
खोतकरांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो प्रदेशाध्यक्षांनी घ्यावा असे अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांनी म्हंटल आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच अर्जुन खोतकर यांना पक्षात घेण्सासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. नुसती चाचपणीच नव्हे, तर जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्जुन खोतकर यांनाच उमेदवारी देण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, खोतकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची गेल्या काही दिवसात दोनदा भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्यातच महिन्या-दोन महिन्यांपासून अर्जुन खोतकर लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा आपणच पराभव करणार असल्याचे सांगत आहेत. किंबहुना, आपणच दानवेंविरोधात लाढणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते, त्यामुळे खोतकरांच्या बोलण्याला महत्त्व आले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजप युतीची घोषणा केली आणि अर्जुन खोतकरांना घोषणांना धक्का बसला. मात्र, तरीही अर्जुन खोतकर मागे हटण्यास तयार नाहीत. दानवेंविरोधात लढण्यासाठी त्यांना शड्डू ठोकला आहे.
अर्जुन खोतकर काय म्हणले?
“काँग्रेसमध्ये जाण्याचा बातम्यामध्ये काही अर्थ नाही. मी कुणालाही भेटलो नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी अंतिम निर्णय घेणार आहे. ठाकरे घराण्याशी मी गद्दारी करणार नाही. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो अंतिम राहील”, असे अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.