Sharad Pawar : आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याच्या वर वाढवायची का? शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar : शरद पवार दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडली. काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे या सभेला उपस्थित होते. जातीय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा यावर भाष्य करण्यात आलं. आता शरद पवार यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.

Sharad Pawar : आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्याच्या वर वाढवायची का? शरद पवार म्हणाले...
Sharad pawar
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 10:03 AM

“महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या प्रचाराची सुरुवात काल पासून झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्यावतीने मी स्वत: उपस्थित होतो” असं शरद पवार यांनी सांगितलं. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ‘मी दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. नागपूरला तीन सभा घेणार आहे’ असं शरद पवार यांनी सांगितलं. “मला विश्वास आहे, महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवा आहे. परिवर्तन पाहिजे आहे. आत्मविश्वास वाढवायचं काम आम्हाला करावं लागेल. आम्ही सर्व सहकारी आजपासून ठिकठिकाणच्या दौऱ्यावर जाणार आहेत” असं शरद पवार म्हणाले.

‘महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का?’ असं वादग्रस्त वक्तव्य काल सदाभाऊ खोत यांनी केलं. त्यावर शरद पवारांना विचारलं असता, त्यांनी बोलणं टाळलं. भाजपात ज्या नावाची मुख्यमंत्रीपदाची चर्चा होते, तो होत नाही, असं तावडे म्हणाल्याच पत्रकारांनी विचारलं. त्यावर याची अंतर्गत माहिती त्यांना अधिक आहे असं उत्तर शरद पवारांनी दिलं.

आरक्षणावर शरद पवार काय म्हणाले?

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, जातीय जनगणना होणार. आरक्षणाची मर्यादा तोडून 50 टक्क्यांच्या वर न्यायची वेळ आलीय, त्यावर शरद पवार म्हणाले की, “मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो. जातीय जगनणनेची मागणी आम्ही मागच्या तीन वर्षांपासून करत आहोत. ती झालीच पाहिजे, त्यातून वास्तव चित्र देशासमोर येईल. ते आल्यानंतरच आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी निर्णय घेता येईल”

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....