दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही, हा शोले आहे, शोले, वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची बॅटिंग; अजितदादांवर हल्लाबोल का?

खासकरून पहाटेच्या शपथविधीची आठवण करून शिंदे यांनी अजितदादांच्या वर्मावर घाव घालण्याचं काम केलं आहे. तसेच आमची युती आणि सरकार भक्कम पायावर उभं आहे, असं सांगण्याचा प्रयत्नही केला आहे.

दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही, हा शोले आहे, शोले, वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची बॅटिंग; अजितदादांवर हल्लाबोल का?
दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही, हा शोले आहे, शोले, वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची बॅटिंग; अजितदादांवर हल्लाबोल का?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 2:19 PM

ठाणे: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राज्यातील विकास कामांच्या मुद्द्यावरून आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका करण्याची अजित पवार एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अजितदादांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पण आता मुख्यमंत्र्यांच्या मदतीला थेट त्यांचा मुलगा धावला आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांनी थेट अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दादा, हा पहाटेचा फ्लॉप शो नाही. हा शोले आहे, शोले, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी अजित दादांना टोला लगावला आहे.

श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… हा ‘शो’ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा! आणि हो… हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली?… पिक्चर अभी बाकी है’!!!, असं सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी ट्विटमधून केलं आहे.

हे सुद्धा वाचा

अजितदादांना डिवचले

श्रीकांत शिंदे यांनी आपल्या ट्विटमधून अजित पवार यांना डिवचले आहे. खासकरून पहाटेच्या शपथविधीची आठवण करून शिंदे यांनी अजितदादांच्या वर्मावर घाव घालण्याचं काम केलं आहे. तसेच आमची युती आणि सरकार भक्कम पायावर उभं आहे, असं सांगण्याचा प्रयत्नही केला आहे.

अजितदादा काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून डिवचले होते. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतल्या. शिवसेना प्रमुखांच्या उपस्थित प्रत्येक दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात दसरा मेळाव्याच्या सभा झाल्या. पण आता ज्यांच्या हातात पॉवर आहे, ते पाहिजे तशा गोष्टी करतात. आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. वाद घालून चालणार नाही, असं सांगतानाच मात्र जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच कळेल. निवडणूक झाल्यानंतर कळेल कोणाची शिवसेना खरी, असा टोला अजित पवार यांनी शिंदेंना लगावला होता.

आम्ही कॅमेरे घेऊन जात नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक ठिकाणच्या गणपती मंडळांना भेट देत आहेत. अनेक नेत्यांच्या घरीही जात आहेत. मात्र, जाताना सोबत कॅमेरामन, फोटोग्राफर घेऊन जात आहेत. त्यावरही अजित पवार यांनी टीका केली. अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा होत आहे. आम्ही सुद्धा दर्शनाला जातो. मात्र तुमच्यासारखे कॅमेरे घेऊन जात नाही. पूर्वी काहीजण शो मॅन होते. अभिनेते राज कपूर हे शो मॅन होते. तसे काही जण आता दिसत आहेत, असा चिमटाही अजित पवार यांनी काढला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.