Ram Temple | अयोध्येत जाऊन भाजपाच्या रामाची पूजा का करु? काँग्रेस नेता बरळला
Ram Temple | अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिराच स्वप्न साकार होणार आहे. अतिशय हा भव्य-दिव्य सोहळा असेल. सध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच कोणाला निमंत्रण दिलं? कोणाला नाही? यावरुन राजकारण रंगलं आहे.
बंगळुरु : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. भव्य अशा राम मंदिराच उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. सध्या अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत भव्य राम मंदिराच स्वप्न साकार होणार आहे. अतिशय हा भव्य-दिव्य सोहळा असेल. सध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच कोणाला निमंत्रण दिलं? कोणाला नाही? यावरुन राजकारण रंगलं आहे. कर्नाटकातील एक काँग्रेस नेता राम मंदिराच्या विषयावर नको ते बरळून गेला. कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि काँग्रेस नेते होलालकेरे अंजनेय यांनी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची प्रभू रामचंद्रांबरोबर तुलना केली. अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन भाजपाच्या रामाची पूजा का करायची? असं हा काँग्रेस नेता बोलून गेला.
अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना का निमंत्रण देण्यात आलेलं नाही? असा प्रश्न होलालकेरे अंजनेय यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. ते चित्रदुर्ग येथे पत्रकारांशी बोलत होते. “सिद्धरमय्या स्वत: राम आहेत. मग, अयोध्येच्या मंदिरातील रामाची पूजा का करायची? तो भाजपाचा राम आहे. भाजपा हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहे. त्यांना जे करायच ते करुं दे” असं होलालकेरे अंजनेय म्हणाले.
‘असे मूर्ख, हिंदू विरोधी भूतकाळात राज्याचे मंत्री होते’
“आमचा राम आमच्या ह्दयात आहे. माझ नाव अंजनेय आहे, तुम्हाला माहितीय त्याने काय केलय” असं काँग्रेस नेता म्हणाला. अंजनेय हे भगवान हनुमानाच दुसर नाव आहे. हनुमान हे प्रभू रामचंद्रांसोबत असायचे. होलालकेरे अंजनेय यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते बसनगौडा पाटील यत्नाल यांनी प्रतिक्रिया दिली. “हे राज्याच दुर्देव आहे, असे मूर्ख, हिंदू विरोधी भूतकाळात राज्याचे मंत्री होते. प्रभू रामचंद्रांबद्दल बोलण थांबवा, प्रभूराम हे हिंदूंचे आदर्श आहेत, त्यांचा आदर करा” असं बसनगौडा पाटील यत्नाल म्हणाले.