वेळ-काळ ठरवा, आम्ही नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो, भाजपने शिवसेनेचे चॅलेंज स्वीकारले

चारही निवडणुका पुन्हा होऊ देत, बघू सिंधुदुर्गची जनता कोणाला हद्दपार करते, असं चॅलेंज राजन तेली यांनी दिलं

वेळ-काळ ठरवा, आम्ही नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो, भाजपने शिवसेनेचे चॅलेंज स्वीकारले
Nitesh Rane
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 4:34 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेलं आहे. शिवसेना-भाजपमध्ये आव्हान प्रतिआव्हानाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आव्हान स्वीकारत शिवसेनेलाच निवडणुकीची वेळ ठरवण्यास सांगितलं आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचं चॅलेंज स्वीकारलं आहे. (Sindhudurg BJP Leader Rajan Teli accepts Shivsena’s challenge)

वेळ आणि काळ सांगा, आम्ही भाजप आमदार नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनीही त्याचवेळी राजीनामा द्यावा. 2024 च्या निवडणुकीची वाट न पाहता त्यांनी वेळ सांगावी. चारही निवडणुका पुन्हा होऊ देत, बघू सिंधुदुर्गची जनता कोणाला हद्दपार करते ते, असं चॅलेंज भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी दिलं आहे.

कोण कुठल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी?

नितेश राणे – कणकवली विधानसभा मतदारसंघ (भाजप) (सलग दोन वेळा आमदार, 2014 मध्ये काँग्रेसकडून, तर 2019 मध्ये भाजपकडून आमदारकी)

वैभव नाईक – कुडाळ विधानसभा मतदारसंघ (शिवसेना) (सलग दोन वेळा आमदार) 2009 मध्ये नारायण राणेंकडून वैभव नाईकांचा पराभव 2014 मध्ये नाईक यांनी पराभवाचा वचपा काढत राणेंना हरवले

दीपक केसरकर – सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ (शिवसेना) (सलग तीन वेळा आमदार) 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेकडून आमदारकी

(Sindhudurg BJP Leader Rajan Teli accepts Shivsena’s challenge)

विनायक राऊत – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ (शिवसेना) (सलग दोन वेळा खासदार) 2014 आणि 2019 मध्ये माजी खासदार निलेश राणे यांचा पराभव

नारायण राणेंची गर्जना

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अकराही आमदार निवडून येणार नाहीत. सर्वांना घरी बसवणार असून कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येईल, अशी गर्जना भाजप खासदार नारायण राणे यांनी केली होती.

शिवसेनेचे चॅलेंज काय?

राणेंना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या नारायण राणेंनी येत्या 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं. शिवसेना काय आहे तुम्हाला कळेलच, असं थेट आव्हानच वैभव नाईक यांनी राणे यांना दिलं.

संबंधित बातम्या : 

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार; नारायण राणेंची गर्जना

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 ला रिंगणात उतरावं, शिवसेनेचं चॅलेंज

(Sindhudurg BJP Leader Rajan Teli accepts Shivsena’s challenge)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.