Satish Sawant | ईश्वरचिठ्ठीने सतीश सावंतांचा पराभव, साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याचा कौल
देवेश एडके या मुलाने चिठ्ठी काढून देसाई यांना कौल दिला आहे. विशेष म्हणजे देवेशने चिठ्ठी काढून कौल दिल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांना पराभव पत्करावा लागला आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कौल आला आहे. ही निवडणूक भाजपने जिंकली असून महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय झाला आहे तर एकूण 8 जांगावर महाविकास आघाडी सरस ठरली आहे. यामध्ये सर्वात चर्चेचा विजय ठरला तो विठ्ठल देसाई यांचा. देवेश एडके या मुलाने चिठ्ठी काढून देसाई यांना कौल दिला आहे. विशेष म्हणजे देवेशने चिठ्ठी काढून कौल दिल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांना पराभव पत्करावा लागला आहे.
चिमुरडा म्हणतो न घाबरता चिठ्ठी काढली
विठ्ठल देसाई आणि सतीश सावंत यांना या निवडणुकीत समान मतं मिळाली. त्यामुळे विजयी उमेदवार ठरवणं कठीण होऊन बसल्यामुळे शेवटी चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित करण्याचे ठरले. दोन्ही उमेदवारांचे भविष्य ठरवण्यासाठी देवेश नरेंद्र एडके या साडेतीन वर्षाच्या मुलाची निवड करण्यात आली. त्यानंतर देवेश याने सतीश सावंत यांच्याविरोधात उभे राहिलेले विठ्ठल देसाई यांचे नाव असलेली चिठ्ठी काढली. या एका चिठ्ठीनंतर सावंत यांचा पराभव झाला तर विठ्ठल देसाई यांच्या गोटात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. एवढी मोठी जबाबदारी पार पाडताना या छोट्या देवेशने न घाबरता चिठ्ठी काढली आहे. तर या कामासाठी देवेशची निवड झाली याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईने दिलीय.
महाविकास आघाडी 8 तर भाजपचा 11 जागांवर विजय
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली असून एकूण 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार आठ जागांवर निवडून आले आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत दिग्गजांना धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे सतीश सावंत पराभूत झाल आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी विजय प्राप्त केला असून भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचादेखील पराभव झाला आहे. या विजयामुळे नारायण राणे यांच्या घरासमोर जल्लोष केला जातोय.
इतर बातम्या :