Sanjay Raut : संजय राऊत आणि ठाकरे गटातील नेत्यांवर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार; भाजप नेता आक्रमक

Nitesh Rane on Sanjay Raut : भाजप अन् अजितदादांचे संबंध रोहित पवारांना काय कळणार? भाजप अन् अजितदादांचे संबंध आणि रोहित पवारांना टोला; भाजप आमदाराचं राष्ट्र्वादीला प्रत्युत्तर. ठाकरे गट आणि खासदार संजय राऊतांवर निशाणा. विनायक राऊत यांनाही टोला लगावला आहे.

Sanjay Raut : संजय राऊत आणि ठाकरे गटातील नेत्यांवर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार; भाजप नेता आक्रमक
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 3:33 PM

सिंधुदुर्ग | 24 सप्टेंबर 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच अजित पवार आणि भाजप, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या मैत्रिपूर्ण संबंधांची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. आता भाजपच्याच एका आमदाराने यावर भाष्य केलंय. नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही टोला लगावला आहे. अजितदादा आणि भाजपचे संबंध काय आहे. हे घराच्या बाहेर राहणाऱ्यांना काय समजणार? रोहित पवार यांनी अजित दादा आणि त्यांचे संबंध सांगावेत. राजकारणाच्या पालिकडे काही नाती असतात. ती रोहित पवार यांनी जपावीत. कोणाला नोटीस पाठवावी आणि पाठवू नये या कायद्याच्या बाजू आहेत, असं नितेश राणे म्हणालेत.

उद्याची सुनावणी पुढे जाईल. विधानसभा अध्यक्षांवर ठाकरे गटाचे नेते खालच्या पातळीची टीका करत आहेत. त्यांना धमक्या देतायेत. दबाव टाकत आहेत. संजय राऊत आणि इतर लोकांवर हक्कभंगाचा प्रस्ताव मी टाकणार आहे. जो निर्णय अध्यक्ष घेतली तो नियमच्या व कायद्याच्या चौकटीत असेल. आज यांना राहुल नार्वेकर चुकीचं वाटत आहेत. पण यापूर्वी उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला कायदा शिकवण्यासाठी नार्वेकर यांच्याजवळ पाठवलं होतं असं का?, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

सामनात नवीन संसदेवर काँग्रेसची भाषा बोलली जात आहे. आम्ही त्या जोतिषांचे आभार मानतो. 2024 ला उबाटा सेना व काँग्रेस च्या खासदारांना संसदेत जागा मिळणार नाही. नवीन संसदेवर बोलणारे हे लोक मातोश्री वरून वर्षावर जाण्यापूर्वी वर्षावर जो खड्डा खणला गेला. तो कोणाला विचारून केला? विधी मंडळाला चोरमंडळ म्हणणारा संजय राऊत… तेव्हा उद्धव ठाकरेंनी माफी मागायला सांगितली का? स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी ह्याची अवस्था आहे. तुझ्या मालकांनी जुनी मातोश्री बाजूला ठेवून नवीन मातोश्री का बांधली. संजय राऊतला नवीन मातोश्री मध्ये जाण्याची परवानगी नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली आहे.

चिपी विमानतळाची परिस्थिती सुधारण्यात नारायण राणेंचं योगदान आहे. शासकीय कामाचे ठेके घेण्या पलीकडे राऊत ला काय जमत नाही. तुम्ही मागील 9 वर्षात काय काम केले त्याचं उत्तर द्या, असं म्हणत नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.