हिंगोलीतून एक-दोन नव्हे, तब्बल सहा ‘सुभाष वानखेडे’ निवडणुकीच्या रिंगणात

हिंगोली : नामसाधर्म्याचा फटका किती बसू शकतो, हे गेल्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याच नावाच्या आणखी एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रायगडमध्ये सुनील तटकरेंना जोरदार फटका बसला होता. तसाच प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. हिंगोलीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणारे तब्बल सहा उमेदवार […]

हिंगोलीतून एक-दोन नव्हे, तब्बल सहा 'सुभाष वानखेडे' निवडणुकीच्या रिंगणात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

हिंगोली : नामसाधर्म्याचा फटका किती बसू शकतो, हे गेल्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याच नावाच्या आणखी एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रायगडमध्ये सुनील तटकरेंना जोरदार फटका बसला होता. तसाच प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. हिंगोलीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणारे तब्बल सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सुभाष वानखेडे यांना या नामसाधर्म्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे माजी खासदार सुभाष बापूराव वानखेडे यांना आघाडीने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे व्यतिरिक्त अन्य दोन सुभाष वानखेडेंना विरोधकांनी लोकसभेच्या रिंगणात उतरविल्याने शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना 1632 मतांनी पराभूत व्हावं लागलं होत. कारण या दोन सुभाष वानखेडेंनी तब्बल 12 हजार 544 मतदान खाल्लं होत आणि यामुळेच शिवसेनेचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे 1632 मतांनी पराभूत झाले होते. पण 2019 च्या निवडणुकीत आघाडीच्या मतांच धुर्वीकरण व्हावं म्हणून सुभाष वानखेडे नावाचे इतर पाच सुभाष वानखेडे नावच्या उमेदवारांना लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुभाष वानखेडे विरोधात आपल्याच नावकर्‍यांचं कडवं आव्हान उभ ठाकलं आहे.

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ‘सुभाष बापूराव वानखेडे’ हे आहेत. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त 5 ‘सुभाष वानखेडे’ रिगणात आहेत.

कोण कोण आहेत इतर ‘सुभाष वानखेडे’?

  1. सुभाष वानखेडे – औंढा नागनाथ तालुक्यातील पूर गावाचे अल्पभूधारक शेतकरी
  2. सुभाष विठ्ठलराव वानखेडे – पूर सेनगाव तालुक्यातील सवना गावचे शेतकरी
  3. सुभाष मारोती वानखेडे – उमरखेडतालुक्यातील खरुस गावचे रहिवशी
  4. सुभाष परसराम वानखेडे – औंढा नागनाथ तालुक्यातील पूर गावचे रहिवाशी
  5. सुभाष वानखेडे – उमरखेड तालुक्यातील सुकळी गावचे रहिवशी

मतांचं धुर्वीकरण व्हावं म्हणून विरोधक एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करत असतात. यापैकी काही उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांच्या विरोधकांनी उभे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक प्रकार घडत असल्याने या निवडणुकीपासून मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून निवडणूक विभागाने मतदान यंत्रावर उमेदवारांच्या निशाणी बरोबर त्यांचा फोटो चिकटवण्याचा निर्णय घेतला आहे.

मागच्या वेळी नावात साधर्म्य असलेल्या इतर दोन सुभाष वानखेडेंनी तब्बल 12 हजार 544 मते घेतली होती आणि सुभाष बापूराव वानखेडेचा केवळ 1632 मतांनी पराभव झाला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.  त्यामुळे या 5 पैकी किती सुभाष वानखेडे आपली उमेदवारी मागे घेतात, यावरुनच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांचं भवितव्य ठरणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.