Rahul Gandhi: श्रीलंकेसारखं भारतातही सत्य बाहेर येईल; राहुल गांधी यांचा दावा
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मीडिया, संस्था, भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (rss) एक सत्य लपवलं. हळूहळू हे सत्य बाहेर येईल. जे श्रीलंकेत घडलंय. श्रीलंकेतही सत्य हळूहळू बाहेर आलं. भारतातही सत्य बाहेर येईल.
नवी दिल्ली: गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मीडिया, संस्था, भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (rss) एक सत्य लपवलं. हळूहळू हे सत्य बाहेर येईल. जे श्रीलंकेत घडलंय. श्रीलंकेतही सत्य हळूहळू बाहेर आलं. भारतातही सत्य बाहेर येईल, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी केली आहे. तुम्ही भारताच्या आर्थिक आणि नोकरीच्या स्थितीची कल्पना करू शकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात असं कधीच पाहिलं नसेल. हे काय होत आहे. या देशातील रोजगाराचा पाठीचा कणा तुटला आहे. लघु आणि मध्यम उद्योजक, छोटे दुकानदार हा आपला कणा आहे, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते शरद यादव (sharad yadav) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे.
अर्थतज्ज्ञ आणि नोकरशहा इतर देशांना पाहून आपल्या योजना तयार करतात. पंतप्रधान म्हणतात आपल्याला त्यांच्यासारखं बनायचं आहे. असं करता येत नाही. आपण कोण आहोत आणि इथे काय करणार आहोत याची जाणीव आधी झाली पाहिजे. त्यांनी कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार वर्षात त्याचे भयंकर परिणाम जाणवणार आहेत, असं राहूल गांधी यांनी सांगितलं.
देशात द्वेष पसरवला जात आहे
मी शरद यादव यांच्या मताशी सहमत आहे. देशाची अवस्था अत्यंत वाईट आहे. द्वेष पसरविला जात आहे. देशाचे तुकडे केले जात आहेत. आपल्याला देश एकसंघ करायचा आहे आणि बंधूभावाच्या रस्त्यावर जायचं आहे. शरद यादव यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना स्वस्थ पाहून आनंद वाटला. तुम्ही त्यांना हसतानाही पाहू शकता. मलाही ते पाहून खूप बरं वाटलं. राजकारणात त्यांनी मला बरंच काही शिकवलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधींना अध्यक्ष करावं
शरद यादव यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिलं पाहिजे. तरच काही तरी मोठी गोष्ट होईल. काँग्रेसला 24 तास चालवण्याचं काम फक्त राहुल गांधी करत आहेत. पक्षाने त्यांना अध्यक्ष बनवलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतरच काही तरी मोठी गोष्ट होईल, असं शरद यादव म्हणाले. तर अध्यक्षपदाबाबत आम्ही विचार करू, असं राहुल गांधी म्हणाले.
In the last 2-3 years, media, institutions, BJP leaders, RSS have hidden the truth. Slowly the truth will come out. That is what is happening in Sri Lanka. The truth came out there. The truth will come out in India: Congress leader Rahul Gandhi pic.twitter.com/Acxm1kkGAC
— ANI (@ANI) April 8, 2022
संबंधित बातम्या:
Breaking News: कर्नाटकातल्या विविध शाळांना एकाच वेळेस धमकीचा मेल, बंगळुरुत ‘बाँब’ची कसून तपासणी
Aurangabad | राज्य सरकारच्या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान, काय आहे निवडणुकांविषयीची याचिका?